DJ Noise pollution

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

निकष ५५ डेसिबलचा अन्‌ मिरवणुकीत आवाज १३२ डेसिबल! सोलापूर शहर पोलिसांनी घेतले रीडिंग; लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन

सोलापूर शहरात ९ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीची सांगता मिरवणूक काढण्यात आली. शहरातील ७३ मंडळांपैकी ४८ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. अनेक मंडळांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून साउंडचा आवाज वाढविला. या पार्श्वभूमीवर सदर बझार पोलिसांनी २१, तर फौजदार चावडी पोलिसांनी १८ मंडळांच्या आवाजाचे रीडिंग घेतले. यातील काही मंडळांचा आवाज १३२ डेसिबलपर्यंत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात ९ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीची सांगता मिरवणूक काढण्यात आली. शहरातील ७३ मंडळांपैकी ४८ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. अनेक मंडळांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून साउंडचा आवाज वाढविला. या पार्श्वभूमीवर सदर बझार पोलिसांनी २१, तर फौजदार चावडी पोलिसांनी १८ मंडळांच्या आवाजाचे रीडिंग घेतले. यातील काही मंडळांचा आवाज १३२ डेसिबलपर्यंत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रत्येकाला शांततेत जगण्याचा अधिकार असून, तो जीवनाच्या मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. शेजारी किंवा इतरांना त्रास होईल इतका आवाज करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऑक्टोबर २००५ मधील निकालात न्यायालयाने वर्षभरातील १५ उत्सवांमध्ये मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी दिली; मात्र त्यासाठी ध्वनीची मर्यादाही निश्चित केली. त्यानुसार लोकवस्तीच्या क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ५५ डेसिबल, तर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ४५ डेसिबलपर्यंत ध्वनीची मर्यादा आहे.

व्यावसायिक क्षेत्रासाठी ही मर्यादा ६५ ते ७५ डेसिबलपर्यंत आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या सांगता मिरवणुकीत काही मंडळांनी ही ध्वनीमर्यादा ओलांडली. याबाबत नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांनी सूचना करूनही काही मंडळांनी आवाज कमी केला नाही. त्यामुळे अशा मंडळांचे रीडिंग घेण्यात आले. यातील काही मंडळांवरील खटले थेट न्यायालयात पाठविले जाणार असून, काहींवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिरवणुकीतील मंडळे अन्‌ आवाज

  • जयंतीतील स्थापन मंडळे : ७३

  • मिरवणुकीतील मंडळे : ४८

  • आवाजाची मर्यादा : ५५ डेसिबलपर्यंत

  • मंडळांचा नोंदविलेला आवाज : ११६ ते १३२ डेसिबल

पोलिस अधिकारी म्हणाले...

  • १) फौजदार चावडी पोलिस : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या सांगता मिरवणुकीत वारंवार सांगूनही काही मंडळांनी आवाज कमी केला नाही. १८ मंडळांच्या आवाजाचे रीडिंग तीन मशीनद्वारे घेण्यात आले. त्यात काही मंडळांचा आवाज ११५ ते १३५ डेसिबलपर्यंत आढळला. या मंडळांवर सहायक पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे.

  • २) सदर बझार पोलिस : पोलिस आयुक्तालयातील शांतता समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी सर्वांना कायद्याचे पालन करून ध्वनीमर्यादा पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीदेखील काही मंडळांनी मिरवणुकीत ११६ ते १३२ डेसिबलपर्यंत आवाज केला. त्यामुळे अशा २१ मंडळांचे रीडिंग घेण्यात आले असून, त्याची माहिती पोलिस उपायुक्तांकडे पाठविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT