महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : आमदारांनी विधीमंडळात चक्क पोलिस अधिकाऱ्याची धुलाई केली होती..

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले, तिथेच विरोधकही आंदोलन करताना दिसले.

सकाळ डिजिटल टीम

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले, तिथेच विरोधकही आंदोलन करताना दिसले.

आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधान भवनात आजचा दिवस वादळी ठरला आहे. मागील चार दिवसांपासून विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, आज या आंदोलनाला गालबोट लागले असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकही आंदोलन करताना दिसले. दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळालं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. मात्र या वादात अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसले. याआधीही आमदारांनी विधीमंडळात एका पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली होती.

९ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये विधिमंडळात पीएसआयला मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर आणि राम कदम यांना पोलिसांनी अटक करून कोर्टात सादर केले होते. त्यांना याप्रकरणी एका दिवसाची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. दोघांनाही क्रॉफर्ड मार्केट येथील कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते.

यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार प्रदीप जैस्वाल, जयकुमार रावल आणि राजन साळवी दिसत नसल्याचा दावा भाजपने केला होता. त्यांचे निलंबन कोणत्या आधारे केले, असा प्रश्नही विरोधी पक्षाने उपस्थित केला होता. दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यास केलेल्या मारहाण प्रकरणातील निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, २०१३ ला विधान भवनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना ठाकूर आणि कदम यांच्यासह १५ आमदारांनी मारहाण केली होती. सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत ठाकूर आणि कदम यांना ओळखले होते. त्यावरून या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांचे जबाब नोंदविल्यानंतर त्यांना गुन्हे शाखा १ ने अटक केली होती. आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांच्या जामीनासाठी कोर्टात निर्णयही झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : चिपळूणमध्ये आजपासून कोकण विभागीय काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT