corona news file photo
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील रुग्णसंख्या वाढतीच! दिवसभरात 36 हजारहून अधिक रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता चिंतेचं वातावरण वाढलं आहे. सध्या या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज राज्यात तब्बल ३६,२६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.०८% एवढा आहे. राज्यात काल गुरुवारी २६,५३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्याची नोंद झाली होती. आज त्यात प्रचंड मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९९,४७,४३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,९३,२९७ (९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८५,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ८,९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,३३,१५४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.१७% एवढे झाले आहे.

ओमायक्रॉनची काय आहे सध्यस्थिती?

आज राज्यात ७९ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे -

मुंबई – ५७

ठाणे मनपा-७

नागपूर -६

पुणे मनपा – ५

पुणे ग्रामीण- ३

पिंपरी चिंचवड –१

आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

Latest Marathi News Live Update : अर्णब बॅनर्जी यांची राज्य तृणमूल युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

IND vs AFG: Rohit Sharma ने इतिहास घडवला! ३७ वर्षे जूना विक्रमही मोडला अन् 'असा' पराक्रम करणारा पहिला भारतीय ओपनर ठरला

काव्या मारनचा मोठा डाव! सनराइजर्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा; टेस्ट टीममधून डच्चू मिळालेल्या स्टार खेळाडूकडे दिली टीमची धुरा

Fake Fertilizer Scam : खत म्हणून विकत होते चक्क मीठ! सोलापुरात १० लाखांच्या भेसळयुक्त खतांचा साठा जप्त; कृषी विभागाचा मोठा छापा

SCROLL FOR NEXT