flood esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील पूरबळींची संख्या १४९ वर; किमान १०० जण बेपत्ता

रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ६० मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १४९ वर पोहोचली आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु असले तरी अद्यापही किमान १०० जण बेपत्ता आहेत, असे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. (the number of flood victims in the maharashtra is over 149)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करत सर्वांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये, तर इतर पूरग्रस्त जिल्ह्यांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे.

राज्यातील मृतांची संख्या

६० : रायगड

४१ : सातारा

२१ : रत्नागिरी

१२ : ठाणे

७ : कोल्हापूर

४ : मुंबई उपनगरे

२ : सिंधुदुर्ग

२ : पुणे

पुराचा तडाखा

५० : जण जखमी

१०० : जण बेपत्ता

३२४८ : जनावरांचा मृत्यू

८७५ : गावांना फटका

२,३०,००० : सुरक्षितस्थळी हलवलेले लोक

बचाव पथके

२५ : एनडीआरफ

४ : एसडीआरएफ

२ : तटरक्षक दल

५ : नौदल

३ : लष्कर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT