शिक्षक
शिक्षक sakal
महाराष्ट्र

शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया मार्चमध्ये! मेमध्ये होणार बदल्या

तात्या लांडगे

गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मार्चपासून राबविण्यात येणार आहे.

सोलापूर : गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्यांची TEachers Transfers) प्रक्रिया मार्चपासून राबविण्यात येणार असून, मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या (Teachers Co-operative Society) शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड (Santosh Pittalwad) यांनी दिली.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या व जिल्हाअंतर्गत बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.

शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.

तसेच आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकांची सेवा खंडीत न करता मूळ सेवा बदली, पदोन्नतीसाठी सलग ग्राह्य धरावी, बदल्यांचे कार्यमुक्ती आदेश मुख्याध्यापकांच्या लॉग इनवर उपलब्ध करावेत, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या अंतर्गत आंतरजिल्हा बदली झालेली असल्यास 30 किलोमीटरच्या आत शाळा देण्यात यावी, बदलीसाठीची 30 जून ग्राह्य धरावी, शाळेत मोफत वीज देण्यात यावी, रॅन्डम राऊंडमध्ये विस्थापित व गैरसोय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा या मागण्या या वेळी निवेदनाद्वारे ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, अवर सचिव सुनील हंजे, रवींद्र गिरी, उपसचिव विजय चांदेकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष नीलेश देशमुख, विभागीय सरचिटणीस दीपक परचंडे, जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT