Free Electricity sakal
महाराष्ट्र बातम्या

Free Electricity : कृषीपंपाना मोफत विजेचा अध्यादेश अखेर जारी

राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत केलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी साडेसात अश्‍वशक्तीपेक्षा कमी अश्वशक्ती असलेल्या पंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत केलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी साडेसात अश्‍वशक्तीपेक्षा कमी अश्वशक्ती असलेल्या पंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे. त्याचे बिल सरकार चुकते करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात ६० लाखाहून अधिक कृषीपंपधारक असून त्यांच्याकडे सुमारे ६० हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अधिवेशनात मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्याचा अध्यादेश कधी निघणार, मोफत वीज कधीपासून लागू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ पर्यंत पुढे पाच वर्षांसाठी ही मोफत वीज असणार आहे. भरपाईपोटी सरकार १४ हजार ७६० कोटी रुपये महावितरणला देणार आहे. या योजनेचा तीन वर्षांनी आढावा घेऊन निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ अशा वेगवेगळ्या संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक भार हलका होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT