डाळिंबाची शेती. solapur
महाराष्ट्र बातम्या

सांगोल्यातील शेतकऱ्याची व्यथा! मुसळधार पावसामुळे पती-पत्नी घरीच थांबले अन्‌ चोरट्याने साधला डाव; ३०० झाडांच्या डाळिंबाची चोरी, मुलांच्या शिक्षणाची चिंता

हातीद (ता. सांगोला) येथील शेतकरी अल्ताफ पापसो मुल्ला यांच्या शेतातील तीन टन डाळिंब चोरट्याने गुरुवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास चोरून नेले. मुल्ला यांनी या प्रकरणी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : हातीद (ता. सांगोला) येथील शेतकरी अल्ताफ पापसो मुल्ला यांच्या शेतातील तीन टन डाळिंब चोरट्याने गुरुवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास चोरून नेले. मुल्ला यांनी या प्रकरणी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अल्ताफ मुल्ला यांनी आपल्या स्वत:च्या शेतात भगवा जातीचे डाळिंब लावले आहे. आता डाळिंब काढणीला आले होते. त्यातून चार पैसे मिळतील, अशी त्यांना आशा होती. मुल्ला यांनी एक एकर बाग जतन केली होती. त्यांच्या एका एकरात ३०० झाडे आहेत. चोरट्याने काही झाडे पूर्ण मोकळी केली तर काही झाडांचे थोडे थोडे डाळिंब काढून नेले आहेत. यंदा चार टन डाळिंब निघेल अशी मुल्ला यांना अपेक्षा होती, पण त्यातील तीन टन डाळिंब चोरट्याने चोरून नेल्याची व्यथा त्यांनी पोलिसांसमोर मांडली. दरम्यान, चालू भावानुसार साडेतीन लाख रुपयांचे डाळिंब चोरीला गेल्याचे मुल्ला यांचे म्हणणे आहे. पण, पोलिस फिर्यादीत ६० हजार रुपयांचेच डाळिंब चोरीला गेल्याची नोंद आहे. त्यांच्या शेतात यायला मुख्य रस्त्यापासून कच्चा रस्ता आहे. त्या रस्त्याने येऊन चोरट्यांनी हा डाव साधल्याचेही मुल्ला यांनी पोलिसांना सांगितले.

बाग राखणारे पती-पत्नी पावसामुळे दोघेही गेले होते घरी

दररोज पती-पत्नी बाग राखायला शेतात जात होते; पण गुरुवारी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दोघेही घरी गेले होते. त्याच मध्यरात्री चोरट्यांनी डाव साधला. चोरीच्या दोन-तीन दिवसांपूर्वी १३० रुपये प्रतिकिलो डाळिंब व्यापाऱ्याने मागितले होते. १५० रुपये भावाने डाळिंब जाईल, अशी शेतकऱ्यास आशा होती. त्यामुळे त्यांनी डाळिंब व्यापाऱ्यास दिले नाही.

कर्ज काढून बाग जनत केली होती. काही दिवसांपूर्वी मरण पावलेल्या भावाची मुले व स्वत:च्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च त्यातूनच भागवत होते. आता चोरट्याने डाळिंब चोरून नेल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

शेतकऱ्याने मांडली पोलिसांसमोर व्यथा

माझ्या शरीरावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्याने माझा सातवीतील मुलगा व पत्नीने बागेची निगा राखली होती. त्यांनीच अहोरात्र मेहनत घेऊन बाग सांभाळली होती. त्यांच्या मेहनतीमुळे माझ्या एक एकरात सोनं पिकलं होतं, पण चोरट्याने डाव साधला आणि एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले, अशी व्यथा त्या शेतकऱ्याने पोलिसांसमोर मांडली. आता पोलिस त्या चोरट्यापर्यंत पोचतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

Ekta Kapoor : इंडियन आर्मीचा अपमान करूनही एकता कपूरवर कारवाई का झाली नाही? पोलिसांनी सांगितलं कारण, म्हणाले त्यांनी पैसे...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT