Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: मुलगा प्रतिक पाटीलच्या शाही विवाह सोहळ्यात या विरोधी पक्षनेत्यांची हजेरी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक यांचा विवाह सोहळा काल थाटामाटात पार पडला

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांचा विवाह सोहळा काल रात्री थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याची भरपूर चर्चा झाली.या शाही विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. पाटील यांच्या विवाह सोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहु महाराज, खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, विधानसभआ अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसह अनेक बडे नेते उपस्थित राहिले.या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते एकत्र आले होते. इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस शाही लग्नसोहळा पार पडला.

शिंदे गटातील नेते आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांची या विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शंभुराज देसाई एकमेकांशी गप्पा मारताना दिसून आले. सुप्रिया सुळे यांनी देसाईंच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर शंभुराज देसाई खो-खो हसले. इतक्यात शेजारीच उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडेही जवळ आले. सुप्रिया सुळे त्यांच्याही कानात काहीतरी कुजबुजल्या. त्यानंतर तिघेही एकत्रित हसताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT