कांद्याला 5000 रुपये भाव sakal
महाराष्ट्र बातम्या

कांद्याला 5000 रुपयांचा भाव! सोलापूर बाजार समितीत 183 गाड्या कांदा आवक; नवा कांदाही आता बाजारपेठेत; कांदा घेवून येणाऱ्या वाहनांना ‘नो थांबा’

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी १८३ गाड्या कांद्याची आवक होती. त्यात पांढरा कांदा २० गाड्या होता. सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक दर पाच हजार रुपयांपर्यंत मिळाला. सरासरी भाव प्रतिक्विंटल चार हजारांपर्यंत होता.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २७) १८३ गाड्या कांद्याची आवक होती. त्यात पांढरा कांदा २० गाड्या होता. सोलापूर बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक दर पाच हजार रुपयांपर्यंत मिळाला. सरासरी भाव प्रतिक्विंटल चार हजारांपर्यंत होता. सध्या येणारा बहुतेक कांदा जुना असून, आता नवीन कांद्याचीही आवक होऊ लागल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, नाशिक, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून कांद्याची आवक होत आहे. याशिवाय म्हसवड, बागलकोट येथून पांढरा व लाल कांदा येत आहे. शुक्रवारी कांद्याचा कमाल दर पाच हजार रुपये तर किमान दर दीड हजार रुपयांपर्यंत होता. सरासरी भाव साडेतीन ते चार हजारांपर्यंत होता, असेही बाजार समितीकडून सांगण्यात आले.

सोलापूर बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जुना कांदा याठिकाणी विक्रीसाठी येत आहे. आता सोलापूर जिल्ह्यातूनही नवीन कांदा बाजारात येवू लागला आहे. पण, शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळावेत, अशी मागणी असून, व्यापारी सध्या १० ते १५ दिवसांची तारीख टाकून शेतकऱ्यांना धनादेश आहेत. त्याकडे जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कांद्याची वाहने थेट बाजार समितीत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केटमध्ये ४०० गाड्या बसतात. सध्या बाजार समितीत दररोज सरासरी १६० गाड्यांची आवक आहे. त्यामुळे बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या गाड्यांना थेट आत सोडले जात आहे. त्यांना बाहेर थांबावे लागत नाही. दिवसभरात ते कधीही कांदा घेऊन बाजार समितीत येऊ शकतात, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

SCROLL FOR NEXT