solapur railway

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर-मंगळवेढा रोडवरील देगावजवळील रेल्वे पूल १४ डिसेंबरलाच पाडला जाणार! पाडकामासाठी लागणार १२ तास; ‘या’ ४५ रेल्वे दुसऱ्या मार्गाने वळविल्या जाणार

सोलापूर- मंगळवेढा रोडवरील देगावजवळील रेल्वेचा जुना पूल १४ डिसेंबर रोजीच पाडला जाणार आहे. रेल्वे प्रशासन राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण महापालिका व शहर पोलिसांची त्या संदर्भात नुकतीच बैठक पार पडली. त्यादिवशी या रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर- मंगळवेढा रोडवरील देगावजवळील रेल्वेचा जुना पूल १४ डिसेंबर रोजीच पाडला जाणार आहे. रेल्वे प्रशासन राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण महापालिका व शहर पोलिसांची त्या संदर्भात नुकतीच बैठक पार पडली. त्यादिवशी या रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे.

सोलापूर शहरातून मंगळवेढाकडे जाताना देगावजवळ हा रेल्वेचा जुना पूल आहे. तो खूप वर्षांपूर्वीचा असल्याने सध्या जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी सोलापूरला येणाऱ्या रेल्वे गाड्या व सोलापूरहून जाणाऱ्या रेल्वे गाड्या अन्य मार्गाने वळविल्या जाणार आहेत. या कामामुळे काही गाड्या रद्द देखील होण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या मुख्यालयातून त्या संदर्भातील नियोजन सुरू आहे.

कोणत्या गाड्या रद्द होणार व कोणत्या गाड्या कोणत्या मार्गाने वळवल्या जाणार आहेत, या संदर्भातील माहिती सोमवारी प्राप्त होईल, असे सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी सांगितले. तर या पुलावरून जाणारी इतर वाहतूक ५४ मीटर रस्त्यावरून व अन्य मार्गावरून वळविण्यात येणार आहे. ६ डिसेंबरपर्यंत ५४ मीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची कार्यवाही महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरु आहे.

पूल पडकामासाठी १२ तास लागणार

देगाव रोडवरील रेल्वेचा जुना पूल १४ डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. हा पूल पाडण्यासाठी अकरा ते बारा तास लागणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यादिवशी या रेल्वेच्या मार्गावरून एकही गाडी ये- जा करणार नाही. जवळपास ४० ते ४५ रेल्वे गाड्या कुर्डूवाडी, पंढरपूर, लातूर, मिरज, हुबळी, सिकंदराबाद अशा मार्गाने वळविल्या जाणार आहेत.

‘या’ मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली जाईल

देगाव जवळील रेल्वेचा पूल १४ डिसेंबर रोजी पाडण्याचे नियोजन झाले आहे. त्या संदर्भात एक बैठक पार पडली असून या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविले जाणार आहे. वाहनधारकांच्या माहितीसाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेकडून त्या संदर्भातील परिपत्रक काढले जाईल.

- एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT