Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांनी चेहऱ्यावर परिधान केलेल्या 'फेस मास्क'चं कारण आलं समोर

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती

अक्षय बडवे

Chandrakant Patil: मागील आठवड्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. हे प्रकरण सध्या तापलेलं आहे. त्यामुळे आज एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील चक्क फेस मास्क घालूनच अवतरले. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात पाटलांनी फेस मास्क घातला होता.

खबरदारीचा म्हणून चंद्रकांत पाटलांनी हा उपाय केल्याचं बोललं जात होतं. आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार अशा आशयाची पोस्ट विकास लोले यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेला भेट दिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एक "फेस शिल्ड" म्हणजेच फेस मास्क परिधान केलं होत.

या मास्कमुळे अनेक स्तरातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र हे मास्क परिधान करण्यामागील कारण चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांचे काही दिवसांपूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे.

यामुळे डॉक्टरांनी त्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला असल्याकारणाने त्यांनी आज तो मास्क घातला आहे. कुठल्या ही प्रकारचं डोळ्यांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी अशा प्रकारचा मास्क घालण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे, असे चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय यांनी "सकाळ" शी बोलताना सांगित. त्यामुळे चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT