burglary crime esakal
महाराष्ट्र बातम्या

सासरवाडीला राहायला आलेला जावईच निघाला चोर! उकाड्यात घर उघडे असणाऱ्या घरात चोरी; 9 घरफोड्या केल्याची कबुली; एक अटकेत तिघांचा शोध सुरू

काही दिवसांपूर्वीच नवीन विवाह झालेला सुनील श्रावण शिंदे हा तुळजापूर- अक्कलकोट सीमेवरील सिंधगाव येथील सासरवाडीला राहायला आला होता. त्याठिकाणी त्याने सख्खा भाऊ अजय व वडील श्रावण आणि नवीन मेव्हणा धमेंद्र विलास भोसले यांच्या मदतीने काही दिवसांत अक्कलकोट उत्तर व दक्षिण भागात सात तर मुरुड व कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी केली.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : काही दिवसांपूर्वीच नवीन विवाह झालेला सुनील श्रावण शिंदे हा तुळजापूर- अक्कलकोट सीमेवरील सिंधगाव येथील सासरवाडीला राहायला आला होता. त्याठिकाणी त्याने सख्खा भाऊ अजय व वडील श्रावण आणि नवीन मेव्हणा धमेंद्र विलास भोसले यांच्या मदतीने काही दिवसांत अक्कलकोट उत्तर व दक्षिण भागात सात तर मुरुड व कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धमेंद्रला अटक करून त्याच्याकडून तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उन्हाच्या उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी अनेकजण घर उघडे ठेवून किंवा गच्चीवर झोपायला जातात. हीच संधी साधून पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी सुनील शिंदे याने त्याचा भाऊ, वडील व मेव्हण्याच्या मदतीने काही दिवसांतच ४० ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन दुचाकी, एक मोबाईल, असा एकूण तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. जिल्हाभरात विविध ठिकाणी होणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान होते. अक्कलकोट परिसरात मागील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घ्यायला गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाला घरफोडीतील आरोपी त्याठिकाणी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्यांनी अक्कलकोट बसस्थानक परिसरात सापळा लावून धमेंद्र भोसले यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने सुनील, अजय व श्रावण यांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी श्रावण जामनाशा शिंदे व सुनील श्रावण शिंदे, अजय श्रावण शिंदे (तिघेही रा. सुभा, जि. धाराशिव) व नात्यातील दिनेश पंपू शिंदे (रा. मानमोडी, ता. तुळजापूर) आणि अटकेतील धमेंद्र विलास भोसले (रा. सिंधगाव, ता. तुळजापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित तीन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी खाक्या दणका दाखवताच गुन्ह्यांची कबुली

अक्कलकोट तालुक्यातील सात तर मुरुड व कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी धमेंद्र भोसले याला पोलिसांनी पकडले. त्यावेळी त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्याने घरफोड्या केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व राजू डांगे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड, महमद मुजावर, पोलिस हवालदार परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, धनराज गायकवाड, सूरज रामगुडे, विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, सतीश कापरे यांच्या पथकाने पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Live Update: जोबिन जोसेफ यांची कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नवी दिल्ली येथील कार्यालयात 'वैयक्तिक प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT