ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही! esakal
महाराष्ट्र बातम्या

ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही!

ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही!

तात्या लांडगे

ओमिक्रॉनची तपासणी राज्यात होत नसल्याने रुग्णवाढीचीही भीती वर्तविली जात आहे.

सोलापूर : राज्यात ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटची तपासणी करण्याची यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे संशयिताच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीवरून त्याची कोरोना (Covid-19) चाचणी केली जाणार आहे. त्यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचा स्वॅब पुण्यातून (Pune) दिल्लीला (Delhi) पाठविला जाणार आहे. कोरोनाने त्याचे अंग बदलल्याने आरोग्य विभागाची पंचाईत झाली असून, ओमिक्रॉनची तपासणी राज्यात होत नसल्याने रुग्णवाढीचीही भीती वर्तविली जात आहे.

पहिल्या लाटेत कोरोना तर दुसऱ्या लाटेत डेल्टा अन्‌ डेल्टा प्लस हे नवे व्हेरिएंट पाहायला मिळाले. कोरोना संशयितांच्या टेस्टिंगसाठी राज्यभर लॅब उभारण्यात आल्या. आरटीपीसीआर टेस्ट त्या ठिकाणी होऊ लागल्या. मात्र, आता ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आला असून त्याच्या प्रसाराचा वेग पूर्वीच्या विषाणूपेक्षा दुप्पट असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्याची बाधा झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून बहुतेक रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. चिंतेची बाब म्हणजे, ओमिक्रॉन झालेल्या बहुतांश रुग्णांनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतलेली नाही. कर्नाटकात आढळलेले दोन्ही रुग्ण आफ्रिकेतून आल्यानंतर 11 ते 20 दिवसांनी सापडले. त्यांच्या संपर्कातील सर्व संशयित सापडले की नाहीत, हे अस्पष्टच आहे. तरीही, महाराष्ट्र सरकारने सावध भूमिका घेऊन राज्याच्या सीमावर्ती भागात तपासणी वाढविली आहे. राज्यातील नऊ कोटी 14 लाखांपैकी साडेसात कोटी व्यक्‍तींनी लस टोचून घेतली आहे. अजूनही पावणेदोन कोटी व्यक्‍ती लसीकरणापासून दूर असून दुसरा डोसही एक कोटी व्यक्‍तींनी घेतलेला नाही. त्यांना आता 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून घरापर्यंत जाऊन लस टोचली जात आहे. मात्र, ओमिक्रॉन संशयितांचा स्वॅब तपासणीची यंत्रणा राज्यात कुठेही नाही. त्यासाठी पुण्याहून दिल्लीला स्वॅब पाठवून रिपोर्टची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्याचा केंद्राला प्रस्ताव...

  • कोविशिल्ड लसीच्या दोन्ही डोसमधील 84 दिवसांचा कालावधी कमी करावा

  • 12 वर्षांवरील लहान मुलांना प्रतिबंधित लस टोचायला द्या मान्यता

  • 40 वर्षांवरील व्यक्‍तींना बूस्टर डोस देण्यास मिळावी परवानगी

ओमिक्रॉन संशयितांची टेस्ट करून त्याचा रिपोर्ट तयार बनविणारी यंत्रणा राज्यात नाही. त्यामुळे संशयितांच्या ट्रॅव्हल डिस्ट्रीवरून त्याचा स्वॅब घेतला जातो. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा स्वॅब पुण्याहून दिल्लीला पाठविला जातो.

- डॉ. संजय ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: तुम्ही इतके स्वस्त आहात का? आमच्या लोकांना ४ कोटी आगाऊ अन् दरमहा १ कोटी; ठाकरेंच्या खासदारांना सवाल!

Monorail: मोनोरेल सुरू होणार पण प्रवाशांच्या खिशाला कात्री, तिकीटांच्या किंमती वाढणार? नवे दर किती आणि कधीपासून लागू?

लग्न होऊनही 5 वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतेय रसिका सुनील, नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात पाणीबाणी, एकाच वेळी सर्व योजना बंद पडण्याची इतिहासात पहिलीच घटना; भोगावती, पंचगंगेच्या पातळीत मोठी घट

SCROLL FOR NEXT