Lockdown
Lockdown Esakal
महाराष्ट्र

चार टप्प्यांत शिथिल होणार लॉकडाउन? दुकानांची वेळ 7 ते 2 पर्यंत

तात्या लांडगे

लॉकडाउन शिथिलतेची घाई न करता टप्प्या-टप्प्याने निर्णय घ्यावेत, असे आपत्ती व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचविले आहे.

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट (Second wave of Corona) ओसरत असतानाच, आता राज्य सरकारने परिस्थिती पाहून 30 जूनपर्यंत चार टप्प्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिलतेच्या नियोजनाला सुरवात केली आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्‍यतेमुळे काही निर्बंध पुढेही कायम राहतील. पहिल्या टप्प्यात दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत केली जाईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापनातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. नागरिकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळाला तर दुकानदारांनाही त्याचा लाभ होईल, असा त्यामागे हेतू आहे. (The state is trying to ease the lockdown in four phases)

राज्यातील कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आता ओसरत असून ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या साडेतीन लाखांपर्यंत आली आहे. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड शिल्लक असून ऑक्‍सिजनची मागणीही कमी झाली आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या लाटेत 23 एप्रिल ते 23 मे या काळात राज्यात 14 लाख 17 हजार रुग्ण आढळले तर 24 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार लॉकडाउन शिथिलतेबाबत जपून पाऊल टाकत आहे. एकाचवेळी नागरिकांची मोठी गर्दी होईल, अशा आस्थापनांना 30 जूनपर्यंत सवलती दिल्या जाणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले असून त्यांना सवलती दिल्या जातील. दरम्यान, ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आल्याने राज्य सरकारने पूर्वतयारीसाठी एक हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यातून 40 हजार ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले जात आहेत. तर रेमडेसिव्हिर खरेदीसाठीही निधी राखून ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

लॉकडाउन शिथिलतेत श्रेयवाद

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात अजूनही अपेक्षित यश मिळाले नसून, दुसरीकडे ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्‍यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे, याचा अंदाज सर्वांनाच आला. सध्या नागपूर, नाशिक, नगर, बीड, अमरावती, यवतमाळ, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, जळगाव अशा 15 जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या अजूनही कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाउन शिथिलतेची घाई न करता टप्प्या-टप्प्याने निर्णय घ्यावेत, असे आपत्ती व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. मात्र, संतापलेल्या नागरिकांसह उद्योजकांचा रोष आणखी वाढू नये म्हणून तिन्ही पक्षांतील मंत्री लॉकडाउन उठविण्यासंदर्भात घाई करीत असल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे.

लॉकडाउन शिथिलतेचे संभाव्य टप्पे...

  • पहिला टप्पा : दुकानांची वेळ सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत वाढविणे

  • दुसरा टप्पा : लोकांच्या दररोजच्या जीवनाशी निगडित आणखी काही दुकानांना परवानगी

  • तिसरा टप्पा : हॉटेल, परमीट रूम, बिअरबार, मद्यविक्री दुकाने निर्बंधासह सुरू होतील

  • चौथा टप्पा : मुंबई लोकल, मंदिरांसह धार्मिक स्थळे, जिल्हाबंदी उठू शकते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT