Latest Government Jobs Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

एकाचवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहिलेल्या सोलापूरची स्थिती! दरवर्षी ४००० नवअभियंत्यांचे स्थलांतर; विमानतळ असूनही सेवा बंदच, IT कंपनी एकही नाही

सोलापूर जिल्ह्यातील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी जवळपास 5000 विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण करतात. मात्र, त्यांची अपेक्षापूर्ती होईल असा रोजगार, जॉब मिळत नसल्याने दरवर्षी अंदाजे चार हजार अभियंते नोकरीसाठी सोलापूर सोडतात ही वस्तुस्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व ‘बाटू’अंतर्गत प्रत्येकी सात अभियांत्रिकी महाविद्यालये सोलापुरात आहेत. त्या महाविद्यालयांमधून दरवर्षी जवळपास पाच हजार विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण करतात. मात्र, त्यांची अपेक्षापूर्ती होईल असा रोजगार, जॉब मिळत नसल्याने दरवर्षी अंदाजे चार हजार अभियंते नोकरीसाठी सोलापूर सोडून परजिल्ह्यात जातात ही वस्तुस्थिती आहे.

एकाचवेळी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यातील अशी ओळख सोलापूरची आहे. सोलापूर हा रब्बीचा व दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तरी, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक ४५हून अधिक साखर कारखाने सोलापुरात आहेत.

जिल्ह्यातील चिंचोली (ता. मोहोळ) या औद्योगिक वसाहतीतील जागा हाऊसफुल्ल झाल्याची स्थिती आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीतही अशीच स्थिती आहे. जिल्ह्यात पंढरपूर, कुंभारी या प्रस्तावीत एमआयडीसी सुरू व्हायला खूप कालावधी लागणार आहे. एमआयडीसीमध्ये उद्योग आले, पण आयटी (स्वॉफ्टवेअर), मॅकेनिकल (मॅन्युफॅक्चरिंग), इलेक्ट्रिकल (पॉवर), सिव्हिल व इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर अपेक्षित जॉब मिळेल, अशा कंपन्या अत्यल्प आहेत. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून स्वप्नांना पंख देणाऱ्या तरुणांना नामांकित कंपन्यांमधील मोठमोठे पॅकेज खुणावते. सोलापुरातील तरुण नोकरीसाठी मुंबई, बंगलोर, हैदराबादसह इतर ठिकाणी जातोय. सध्या अनेक तरुण अभियंते देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये आहेत.

नवअभियंत्यांची अपेक्षा पूर्ण होतील अशा उद्योगांची गरज

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांची अपेक्षापूर्ती होत नसल्याने सोलापुरातील अनेकजण नोकरीसाठी दुसरीकडेच जातात ही वस्तुस्थिती आहे. महाविद्यालयांमधील प्लेसमेंटमध्ये देखील तरुणांचा तसा कल पाहायला मिळतो. सोलापुरात विमानसेवा व आयटी इंडस्ट्रीज आल्यास हे चित्र बदलू शकते.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव

शिक्षणाबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाची गरज

आपल्या तरुणांमध्ये खूप टॅलेंट असून त्यांना शिक्षणासोबतच कौशल्य प्रशिक्षणाचीही गरज आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना अपेक्षित जॉब स्थानिक पातळीवर मिळत नाही. विमानसेवा सुरु नसल्याने बाहेरील मोठमोठे उद्योजक येत नाहीत. इथे आयटी कंपन्या, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकलमध्येही पुरेशा प्रमाणात जॉब नाहीत. त्यामुळे तरुण अपेक्षा पूर्ण होतील म्हणून दुसरीकडे स्थलांतर करतोय.

- डॉ. जे. बी. दफेदार, शिक्षणतज्ज्ञ, सोलापूर

जिल्ह्यातील ‘अभियांत्रिकी’ची स्थिती

  • पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय

  • १९८३

  • सध्याची एकूण महाविद्यालये

  • १४

  • प्रवेश क्षमता

  • ५,२००

  • जॉबसाठी अंदाजे स्थलांतर

  • ४,०००

विमानसेवा नाही, आयटी कंपन्याही नाहीत

सोलापूरची विमानसेवा कित्येक वर्षांपासून बंदच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी ‘उडान’ योजनेत सोलापूरचा पहिल्याच टप्प्यात समावेश झाला. तरीपण आठ-नऊ वर्षांत सोलापुरातील एकाही सर्वसामान्यांना योजनेतील विमानात बसण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे ११ आमदार, सतत राज्याच्या मंत्रिमंडळात किमान एकतरी मंत्री राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही आयटी कंपनी आली नाही, हे दुर्दैवच. जिल्ह्यातून हजारो उच्चशिक्षित तरुण स्थलांतर करतात ही वस्तुस्थिती असतानाही त्यांची अपेक्षापूर्ती होईल, असे उद्योग सोलापुरात आले नाहीत, हेही विशेषच. आता कोण पुढाकार घेणार, याकडे तरूणांचे लक्ष आहे.

जिल्ह्यातील तरुणांचे १९८७ पासून स्थलांतर

सोलापूर शहरात १९८३मध्ये पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय ‘डब्ल्यूआयटी’ सुरु झाले. त्यानंतर स्वेरी, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, बीएमआयटी, सिंहगड अशा १४ महाविद्यालयांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले. दरवर्षी पाच हजारांहून अधिक तरुणांना अभियंता होण्याची संधी मिळाली. पण, शिक्षणानंतर जॉबच्या निमित्ताने त्यांना स्वत:च्या पालकांना सोडून परजिल्ह्यात जावे लागते ही वस्तुस्थिती ३६ वर्षांत बदललेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT