Exam studant sakal
महाराष्ट्र बातम्या

परीक्षा केंद्राबाहेर तीन तास असणार बैठे पथक! सोमवारपासून विद्यापीठाची परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सोमवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील जवळपास ७८ हजार विद्यार्थी परीक्षा देतील. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सोमवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील जवळपास ७८ हजार विद्यार्थी परीक्षा देतील. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आले आहेत. विद्यापीठाची चार भरारी पथके व एक अचानक भेट देणारे पथक असणार आहे.

बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे पहिले सत्र आणि बीएड, बीपीएड, एमएड, एमपीड, बीए-एलएलबी या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे तृतीय सत्र २३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. एलएलबीच्या द्वितीय वर्षाचे तिसरे सत्र २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे पाचवे सत्र २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अभियांत्रिकीच्या (बी-टेक) तृतीय वर्षाचे सत्र पाचवे व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सत्र सातवे २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीई-आर्किटेक्चरच्या द्वितीय वर्षाचे तिसरे सत्र देखील त्याचवेळी सुरू होईल. बी-टेक अभ्यासक्रमाचे द्वितीय वर्षाचे तिसरे सत्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात बी-टेकच्या पहिल्या वर्षाचे प्रथम सत्र सुरू होईल. दरम्यान, कोरोनानंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना वर्णनात्मक प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता अभ्यासपूर्ण तयारीनिशी परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठ परीक्षेची स्थिती

  • एकूण महाविद्यालये

  • १०९

  • परीक्षार्थी विद्यार्थी

  • ७७,४००

  • सरासरी परीक्षा केंद्रे

  • ४८

  • भरारी पथके

  • बैठे पथकांची संख्या

  • ५२

परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी नियोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सोमवारपासून (ता. २३) जिल्ह्यातील ४८ केंद्रांवर सुरू होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेवर बैठे पथक, भरारी पथकाची नजर राहणार आहे.

- डॉ. शिवकुमार गणपूर, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

अर्धा तास अगोदर या परीक्षा केंद्रावर

विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र चालकांना परीक्षेच्या दीड तास अगोदर ऑनलाइन पद्धतीने संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका पाठविली जाणार आहे. त्यानंतर त्याचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत होईल. दरम्यान, परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशी सूचना विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक (परीक्षा नियंत्रक) डॉ. शिवकुमार गणपूर यांनी विद्यार्थ्यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोने खरेदीच्या तयारीत आहात? तर आधी हे वाचाच! सोने आणि चांदीच्या दरात अजून घसरण होणार का? तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Supreme Court Orders Mamata Banerjee Government : सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा धक्का! ; २० लाख कर्मचाऱ्यांना २५ टक्के महागाई भत्ता द्यावा लागणार

लग्नाआधीच मृणाल ठाकूर गरोदर? अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Yeola Farmers Protest : कांद्याला हमीभाव द्या! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव बंद पाडून 'रास्ता रोको'

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांचा माजी आमदारांना फोन

SCROLL FOR NEXT