Gold

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

चोरट्याने पाहुण्यालासुद्धा सोडले नाही! नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडातून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांची साडेपाच लाखांची चोरी, वाचा...

सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन येथे नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडातून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांचे दागिने, महागडी दोन घड्याळे व डेबिट कार्ड चोरट्याने लंपास केले आहे. मंगळवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास ही चोरी झाली. या प्रकरणी प्रमोद राजेंद्र हलबुर्गी यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन येथे नातेवाईकांच्या विवाहासाठी कॅनडातून सोलापुरात आलेल्या पाहुण्यांचे दागिने, महागडी दोन घड्याळे व डेबिट कार्ड चोरट्याने लंपास केले आहे. मंगळवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास ही चोरी झाली. या प्रकरणी प्रमोद राजेंद्र हलबुर्गी यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता विवाह असल्याने फिर्यादी सहा वाजता हेरिटेज लॉन येथे सहा वाजता आले. पत्नी व मुलीला यायला उशीर झाला आणि त्या दोघी पावणेआठच्या सुमारास विवाहस्थळी पोचल्या. त्यांच्याजवळ एक बॅग होती, बॅगेत दागिने, घड्याळ व विविध बॅंकांचे डेबिट कार्ड होते. वधू-वरांना भेटून आल्यावर समोरील सोफ्यावर ते बसले. दागिने असलेल्या बॅगेवर लहान मुलींची मिनी पर्स ठेवली होती आणि नातेवाईकांना भेटायला गेले. रात्री नऊ वाजता बॅग पाहिली त्यावेळी ठेवलेल्या ठिकाणी बॅग होती.

त्यानंतर आम्ही दोघे फोटो काढायला गेलो आणि साडेनऊ वाजता सोफ्यावरील बॅग पाहिली तर लहान मुलीची बॅग होती. दागिने ठेवलेली बॅग त्याठिकाणी नव्हती. इतरत्र शोध घेतला, विचारणा केली पण कोणाकडेच बॅग सापडली नाही. त्यानंतर तातडीने प्रमोद हलबुर्गी यांनी पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाद्वारे चोरट्याचा शोध सुरु आहे.

चोरीला गेलेला मुद्देमाल असा...

  • दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस

  • साडेतीन तोळ्याचा जाड पट्टीचा सोन्याचा हार

  • चार तोळे वजनाचा तीनपट्टी चेन असलेला सोन्याचा हार

  • एक तोळ्याची कर्णफुले

  • १७ हजार रुपयांची दोन घड्याळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup ENG vs WI : वेस्ट इंडिजने पुन्हा इंग्लंडला नमवले ! स्वतः सेफ झाले, पण क गटात स्कॉटलंडसोबत लावलं भांडण

Pune Accident: दोरी घासून गळा कापला! ठेकेदाराचा निष्काळजीपणा तरुणाच्या जिवावर; पुण्यातली घटना

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोर कंटेनर व पिकअपचा अपघात एक ठार, तीन जखमी

Crime: प्रेम प्रकरण की आणखी काही...? आत्या आणि भाचीनं एकाच वेळी जीवन संपवलं; पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT