solapur city police sakal
महाराष्ट्र बातम्या

किलोमध्ये चांदी तर तोळ्यांमध्ये दागिने चोरणारा चोरटा जेरबंद! सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी; सोलापूर शहर, बारामतीतील चोऱ्या उघडकीस; दागिने वितळविण्याची मशिनही जप्त

शहरातील जोडभावी पेठ, फौजदार चावडी पोलिस ठाण्याबरोबरच बारामती शहर व ग्रामीणच्या हद्दीतून घरफोडी करून चोरट्याने चोरलेले ३१ तोळे सोने (३८९.३ ग्रॅम) व १८ किलो चांदी (१७,८३५ ग्रॅम) शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) याला जेरबंद केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ, फौजदार चावडी पोलिस ठाण्याबरोबरच बारामती शहर व ग्रामीणच्या हद्दीतून घरफोडी करून चोरट्याने चोरलेले ३१ तोळे सोने (३८९.३ ग्रॅम) व १८ किलो चांदी (१७,८३५ ग्रॅम) शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) याला जेरबंद केले आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजकुमार विभूते हा पहाटे पाचच्या सुमारास सोलापूर मार्केट यार्ड परिसरात फिरत असल्याची खबर मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला. त्यावेळी त्याने २०२३ मध्ये सोलापूर शहरातील जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर राजकुमार विभूते याने साथीदार मित्राच्या मदतीने बारामती शहर व ग्रामीण हद्दीतही घरफोड्या केल्याचेही सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडील चोरीचा संपूर्ण मुद्देमाल (अंदाजे किंमत २२ लाख ७८ हजार ४०० रुपये) हस्तगत केला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, सतीश काटे, सायबर पोलिस ठाण्याचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.

दागिने वितळविण्याची मशिनही जप्त

संशयित आरोपी राजकुमार विभूते याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने मागील दीड वर्षांत सहा ठिकाणी घरफोडी, चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडे चोरीसाठी महागडी कार होती. याशिवाय सोन्या-चांदीचे दागिने वितळविण्याची मशिन देखील होती. पोलिसांनी कार व ती मशिन जप्त केली आहे. चोरीचे दागिने कोणालाही ओळखता येवू नयेत म्हणून तो मित्राच्या मदतीने वितळून त्यापासून बिस्किटे तयार करीत होते.

यापूर्वी पण चोरले होते किलोमध्ये दागिने

पोलिसांनी पकडलेला संशयित आरोपी राजकुमार विभूते याचे चार-पाच जिल्ह्यात नेटवर्क आहे. यापूर्वीही त्याच्यावर बॅंक फोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी किलोमध्ये दागिने हस्तगत केले आहेत. त्यावेळी पण त्याच्याकडे दागिने वितळविण्याची मशिन सापडली होती. रात्रीच्यावेळी गॅस कटरने घरफोडी करण्यात ते पटाईत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT