Wagh Nakh sakal
महाराष्ट्र बातम्या

Wagh Nakh : लंडनमधील वाघनखं शिवरायांची नाहीत ;इंद्रजित सावंत,सरकारकडून दिशाभूल

‘‘लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियम’मधून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत,’’ असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी येथे केला.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियम’मधून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत,’’ असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सोमवारी येथे केला. सरकारमधील संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सावंत म्हणाले, ‘‘सरकार व संग्रहालय यांच्यात तीन ऑक्टोबर २०२३ रोजी विविध वाघनखांपैकी एक वाघनखं तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर आणण्याचा सामंजस्य करार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती शिवरायांची असल्याचा दावा प्रसारमाध्यमांतून केला होता. ही वाघनखं शिवरायांची नसल्याबाबत मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव व राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांना पत्राद्वारे कळवले होते. संग्रहालयाकडून मागविलेल्या माहितीतून ती वाघनखं शिवरायांची आहेत, असा कोणताही पुरावा नाही.’’

इतिहास अभ्यासक एच. वेबरीज याने १९२१ मध्ये केंब्रिज विद्यापीठाकडून छापलेल्या लेखात ‘व्हिक्टोरिया अॅन्‍ड अल्बर्ट म्युझियम’मध्ये असणारी वाघनखं शिवरायांच्या वाघनखांची प्रतिकृती असल्याचे म्हटले आहे.

- इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT