electric bus  esakal
महाराष्ट्र बातम्या

Electric vehicle : इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी परिवहन विभागावर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरणाची राज्यात अंमलबजावणीसाठी परिवहन विभागाला नो़डल विभाग म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ अंतर्गत वर्ष २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असावा यासाठी राज्य शासनाकडून प्रभावीपणे प्रयत्न केले जात आहे.

यामध्ये सर्वाधीक प्रयत्न मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या सहा प्रदूषित शहरामध्येकिमान २५ टक्के सार्वजनिक वाहतूक वाहनेही बॅटरी इलेक्ट्रिक वाहन असावे असा लक्षांक ठेवण्यात आला आहे.

वर्ष २०२५ पर्यंत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या सहा प्रदूषित शहरातील २५ टक्के मालवाहतूक वाहन सुद्घा बॅटरी इलेक्ट्रीक वाहन प्रकारातील असावीत. महाराष्ट्राला भारतातील इलेक्ट्रीक वाहन उत्पादन क्षमतेच्या बाबतीत सर्वोच्च उत्पादक राज्य करणे.

राज्यात इलेक्ट्रीक वाहने आणि त्यांचे घटक यासाठी संशोधन आणि विकास , कौशल्य विकास यांचे नियोजन करण्यासाठी राज्यातील विविध विभागांना वेगवेगळया जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यासाठी विविध अभियान, धोरणे, उद्दिष्टे आणि इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी धोरण लक्षे ठरविण्यात आली आहेत.

त्यानुसार ऊर्जा विभाग, नगर विकास विभाग , उद्योग विभाग , उच्च व तंत्रशिक्षण विभाग, परिवहन विभाग इत्यादी विभागांना धोरणामधील विविध प्रोत्साहने व अंमलबजावणीची विभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

धोरण लक्षांकानुसार परिवहन विभागास इलेक्ट्रिक वाहन व तद्नुषंगिक प्रोत्साहने याअंतर्गत मुलभूत मागणी प्रोत्साहने, त्वरीत नोंदणी सुट, वाहन मोडीत काढण्यासाठीचे प्रोत्साहने, बॅटरी हमी आणि आश्वासित बायबॅक करारावर प्रोत्साहने आणि इतर मागणी विषयक प्रोत्साहने असा बाबी सोपविल्या आहेत.

त्याशिवाय वाहनांची नोंदणी, अनुज्ञप्ती जारी करणे, परवाना जारी करणे, योग्यता प्रमाणपत्र जारी करणे आणि मोटार वाहन कायदे व नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे इत्यादी कामे परिवहन विभागामार्फत केली जातात.

त्यामूळे यापुढे इलेक्ट्रिक वाहनांबाबतची सर्व कामे परिवहन विभागामार्फत हाताळली जाणार आहे. त्याशिवाय विविध विभागांतर्गत समन्वय साधण्यासाठी नोडल विभाग म्हणून सुद्धा परिवहन विभागाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT