महाराष्ट्र

वाचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या खडकवासल्यातील फोटोमागील सत्य

निलेश बोरुडे

किरकटवाडी: फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा समाज माध्यमांवर सध्या एक फोटो खुप व्हायरल झाला आहे. दिवसभर अनेक घरांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचवणारा एक वयस्कर कर्मचारी कामावरुन घरी जाताना साकलच्या कॅरेजवर जळावू लाकडांची मोळी बांधून घेऊन चाललेला या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोसह समाज माध्यमांवर वेगवेगळ्या आशयाच्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. गरीबांचे कसे हाल होताहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न या फोटोच्या माध्यमातून होताना दिसत आहे.

जाणून घेऊया हा फोटो आणि त्यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीविषयी...

फोटोमध्ये दिसणाऱ्या या पासष्ट वर्षीय व्यक्तीचं नाव आहे मारुती गणपती थोपटे. सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मागील पंधरा वर्षांपासून मारुती थोपटे हे खडकवासला येथील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर घरोघरी पोहोचवण्याचे काम करत आहेत. सायकलवरून सिलिंडर पोहोचवणारे मारुती थोपटे हे खडकवासला, किरकटवाडी व परिसरात 'थोपटे मामा' म्हणून ओळखले जातात. शांत,संयमी, मणमिळाऊ स्वभावाचे थोपटे मामा प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत.

साधं राहणीमान ही थोपटे मामांची जीवनशैली...

थोपटे मामांचा फोटो व्हायरल झाला आणि त्यांच्या गरिबीविषयी चर्चा सुरू झाली. मात्र साधं राहणीमान असलेल्या व लहाणपणापासूनच कष्टाची सवय असलेल्या आणि गरीबीची जाण असलेल्या थोपटे मामांना सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाल्यापासून निवृत्तीवेतन सुरू आहे. किरकटवाडीतील शिवनगर येथे त्यांची तीन मजली इमारत आहे. मुलंही सुशिक्षित असून त्यांनाही मोठा पगार आहे. तसेच मुलाचा एका मोठ्या सोसायटीत फ्लॅट आहे. मालखेड या ठिकाणी मामांची पंधरा एकर शेती आहे. सर्व काही सुरळीत आहे. मात्र थोपटे मामांची बंबामध्ये पाणी तापवण्याची जुनी सवय आहे. त्यासाठी कधीतरी कामावरुन सुटल्यानंतर ते जळाऊ लाकूड घेऊन जातात.

फोटोमुळे मामांना काही अडचण तर होणार नाही ना?

कामावरुन घरी जाताना सिंहगड रस्त्यावर खडकवासला गावच्या हद्दीत मुकाई मंदिराच्या समोर थोपटे मामांचा फोटो कुणीतरी काढला. तो सगळीकडे व्हायरल झाला. याबाबत बोलताना मामांसोबत गॅस एजन्सीमध्ये काम करणारे एक ज्येष्ठ सहकारी चिंता व्यक्त करत म्हणाले की या फोटोमुळे मामांना काही त्रास तर होणार नाही ना?

कोणीतरी पोरांनी खोडसाळपणा केला

याबाबत बोलताना थोपटे मामा म्हणाले, "मी साधा माणूस आहे. पोरांनी कोणीतरी खोडसाळपणा केला आणि माझा फोटो काढून सगळीकडे पाठवला. वाऱ्याने पडलेली वाळलेली बाभळीच्या झाडाची फांदी तोडून माझा मी चाललो होतो. मला न कळू देता मागून गुपचूप कोणीतरी फोटो काढला."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT