News Updates Esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : मविआमध्ये रस्सीखेच सुरू! मुंबईतील सहापैकी 'या' चार जागांवर ठाकरे गटाचा दावा

रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात तयारी सुरू करण्यात आली असून जागांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबईतील लोकसभेच्या चार जागांवर दावा केला आहे.

उद्धव ठाकरे गट मुंबईच्या सहा पैकी चार जागा लढण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी चार जागांवर दावा केला आहे. तर एक काँग्रेसला आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची ठाकरे गटाच्या नेत्यांची भूमिका आहे.

दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार जागांवर ठाकरे गट आग्रही आहे. याशिवाय ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि भिवंडीसाठी देखील ठाकरे गट उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अरविंद सावंत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक आहे.

तसेच उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाने त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. तर ईशान्य मुंबई लोकसभेचे विद्यमान खासदार हे भाजपचे मनोज कोटक आहेत. ईशान्य मुंबई लोकसभेसाठी अद्याप ठाकरे गटाकडून नाव निश्चित करण्यात आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT