Bhima Cooperative Sugar Factory s sakal
महाराष्ट्र बातम्या

Sugercane News: साखरकारखान्याच्या वजन काट्याची अचानक झाली तपासणी अन्, वाचा पुढे काय झाले

Bhima Cooperative Sugar Factory : पथक सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजन काट्याची तपासणी करीत आहे.

राजकुमार शहा

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची गुरुवारी अचानक तपासणी करण्यात आली, मात्र तपासणी करून तपासणी पथकाने वजन काटा योग्य व चोख असल्याचा निर्वाळा दिला.

साखर कारखाने उसाचा काटा मारतात व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते अशा अनेक तक्रारी विविध शेतकरी संघटनांनी केल्या आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने पथक नेमून वजन काटे तपासणीसाठी तीन सदस्यीय पथक नेमले आहे. ते पथक सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजन काट्याची तपासणी करीत आहे.

गुरुवारी अचानक कारखान्यावर पथक आले व त्यांनी एकच वाहन तीन ठिकाणच्या वजन काट्यावर फिरविले व तपासणी केली. तसेच 20 किलोची प्रमाणित वजनेही वजन काट्यावर ठेवून त्यांची ही पडताळणी केली, मात्र फरक आढळून आला नाही.

गेल्या 10 ते 15 वर्षापासून कारखान्याच्या वजन काट्या बाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार आली नाही. तसेच बाहेर कुठल्याही वजनकाटयावर ऊस वजन करा व तो पुन्हा भिमाच्या काट्यावर वजन करा एक किलोचा जरी फरक पडला तरी एक लाख रुपयाचे बक्षीस कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार धनंजय महाडिक यांनी जाहीर केले आहे.

यावेळी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे म्हणाले, भिमाचा काटा चोख आहे म्हणुन शेतकऱ्यांचा भीमा वर मोठा विश्वास आहे. तो विश्वास वजन काटा तपासणीमुळे पुन्हा दृढ झाला आहे. भिमाने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, उपाध्यक्ष सतीश जगताप, पुरवठा निरीक्षक पी एच मगर, उपनियंत्रक ए डि गेटमे, शेतकरी प्रतिनिधी अश्रूभान येळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT