minister dr. tanaji sawant sakal
महाराष्ट्र बातम्या

तांत्रिक मान्यतेत अडकले जिल्हा रुग्णालयाचे काम! तत्कालीन राज्यमंत्र्यांनी रुग्णालय आणले, आता आरोग्यमंत्री सोलापूरचे, तरी काम पूर्ण होईना

जिल्हा रुग्णालयाचे लिफ्ट व फर्निचरची कामे राहिली असून त्यासाठी अंदाजे पाच कोटींचा निधी अपेक्षित असून त्या कामाला संचालक स्तरावरून तांत्रिक मान्यताही आवश्यक आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवूनही अद्याप ना मान्यता ना निधी मिळाला, अशी वस्तुस्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नोव्हेंबर २०१९ मध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले २०० खाटांचे जिल्हा रूग्णालय नोव्हेंबर २०२३ पर्यंत तरी सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले झालेले नाही. लिफ्ट व फर्निचरची कामे राहिली असून त्यासाठी अंदाजे पाच कोटींचा निधी अपेक्षित असून त्या कामाला संचालक स्तरावरून तांत्रिक मान्यताही आवश्यक आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवूनही अद्याप ना मान्यता ना निधी मिळाला, अशी वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ५००हून अधिक उपकेंद्रे आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी अनेक उपकेंद्रे केवळ लसीकरणाच्या दिवशीच उघडतात अशी वस्तुस्थिती आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अजूनही प्राथमिक स्वरूपाचेच उपचार होतात. त्या रूग्णालयांमध्ये आयसीयूची सोय नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण सर्वोपचार रूग्णालयातच (सिव्हिल) येतात. ही दुरवस्था ओळखून तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरसाठी २०० खाटांचे जिल्हा रूग्णालय मंजूर करून घेतले. त्यासाठी सोलापूर शहरातील गुरुनानक चौकातील जागा मिळाली आणि कामाला सुरवात झाली. कोरोनामुळे काही महिने काम बंद होते, पण आता कोरोना जावूनही दीड वर्षे झाली. मात्र, रूग्णालयाची अजूनही प्रतिक्षाच आहे. शासन स्तरावरून तांत्रिक मान्यता व निधी मिळाल्यावर काम सुरु होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘सिव्हिल’मधील आयसीयू, खाटा नेहमीच हाऊसफुल्ल

जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा भार पडतोय. त्याठिकाणचे ‘आयसीयू’ खाटा नेहमी हाऊसफुल्ल असतात. सर्वोपचार रुग्णालयातील खाटांची क्षमता ७५०पर्यंत आहे, पण त्याठिकाणी नेहमीच एक हजारांवर रुग्ण ॲडमिट असतात. सिटीस्कॅन मशीन अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाला पर्याय म्हणून जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते.

राज्यमंत्र्यांनी रुग्णालय आणले, आरोग्यमंत्री जिल्ह्याचे असतानाही विलंब

सोलापूर जिल्ह्यासाठी जिल्हा रूग्णालय व्हावे म्हणून तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर सोलापूरसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये जिल्हा रुग्णालय मंजूर झाले. निधी मिळताच कामाला सुरवात देखील झाली. रूग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते. पण, कोरोनामुळे विलंब लागला. आता इमारतीचे काम पूर्ण झाले, पण लिफ्ट व फर्निचरचे काम बाकी आहे. त्यासाठी निधी मिळावा म्हणून वारंवार पत्रव्यवहार झाला, स्मरणपत्रेही पाठविली, पण निधी मिळालाच नाही. सध्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी भूमिपूत्र डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे आहे. तरीदेखील विद्यमान सरकारच्या दीड वर्षांच्या काळात हे रूग्णालय सुरू होवू शकलेले नाही, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT