court help

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

अत्याचार पीडितांची चिंता मिटली! ‘या’ क्रमांकावर कॉल केल्यास मिळणार मोफत वकील; केसचा निकाल लागेपर्यंत एक रुपयाही फी म्हणून द्यावी लागणार नाही, वाचा...

मुलीवर किंवा कुटुंबातील महिलेवर अत्याचार होऊनही अनेकदा वकिलांची फी भरण्याची ऐपत नसल्याने पीडिता समोर येत नाहीत. पोलिसांत गेलो तर आपल्याला न्याय मिळेल का, असाही प्रश्न पीडितेच्या मनात असतो. अशावेळी पीडितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील व कायदेशीर सल्ला मिळतो.

सकाळ डिजिटल टीम

तात्या लांडगे

सोलापूर : मुलीवर किंवा कुटुंबातील महिलेवर अत्याचार होऊनही अनेकदा वकिलांची फी भरण्याची ऐपत नसल्याने पीडिता समोर येत नाहीत. पोलिसांत गेलो तर आपल्याला न्याय मिळेल का, असाही प्रश्न पीडितेच्या मनात असतो. अशावेळी पीडितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील व कायदेशीर सल्ला मिळतो. विशेष म्हणजे केसचा निकाल लागेपर्यंत पीडितेस एक रुपया देखील द्यावा लागत नाही.

बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेकदा आरोपी जवळचेच नातेवाईक असतात. बालकाने सांगितल्यावर पालक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. याशिवाय पोलिसांत गेल्यावर आपल्याच कुटुंबाची बदनामी होईल, मुलीचे आयुष्याचे वाटोळे होईल, बदनामी मुळे तिला शाळा-महाविद्यालयात जाता येणार नाही, तिचा विवाह होणार नाही, याची चिंता पालक करतात. पण, पोलिसांत तक्रार दिल्यावर त्याचे नाव, पीडितेचे नाव, गाव, पत्ता उघड केला जात नाही. तसेच न्यायालयात देखील पीडितेची साक्ष इन कॅमेरा न्यायाधीशांसमोर नोंदविली जाते. गुन्ह्याचा तपास देखील महिला अधिकाऱ्यांकडेच सोपविला जातो. त्यामुळे अत्याचार झाल्यावर कोणतीही शंका, भीती न बाळगता संबंधित कुटुंबाने, पीडितेने तक्रार द्यावी, असे विधिज्ञ म्हणाले.

राज्यघटनेतील कलम १४ नुसार समानतेचा तर कलम १५ मध्ये भेदभावाविरुद्धचा अधिकार देण्यात आला आहे. याशिवाय बालकांवरील लैगिंक अत्याचारावर ‘पोक्सो’ कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होताच, संशयितास अटक होऊन तो खटला जलदपणे चालविला जातो. त्यावेळी कोणतेही शुल्क न घेता वकील पीडितेची बाजू न्यायालयात मांडतात.

‘हे’ नंबर लक्षात ठेवाच...

  • बालविवाह किंवा अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचाराच्या तक्रारीसाठी : १०९८

  • अडचणीवेळी पोलिसांची लगेच मदती मिळविण्यासाठी : ११२

  • अत्याचार पीडितांना मोफत वकील मिळविण्यासाठी : १५१००

पीडितांच्या मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

अत्याचाराच्या घटना तथा गुन्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अत्याचार पीडितेस मोफत वकील व कायदेशीर सल्ला दिला जातो. अनेकजण वकिलांच्या फी किंवा अन्य कारणांमुळे तक्रार देत नाहीत. पण, पीडितांनी किंवा तिच्या पालकांनी धाडसाने पुढे येऊन आरोपीविरुद्ध तक्रार द्यावी, जेणेकरून त्या आरोपीचे मनोबल वाढून गंभीर परिणामांना सामोरे जायला लागू शकते.

- ॲड. देवयानी किणगी, सहायक लोकअभिरक्षक, सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Case : दिल्ली ब्लास्टच्या आधीचा आरोपी डॉ. उमरचा धक्कादायक व्हिडीओ समोर...आत्मघाती हल्ल्याबाबत काय म्हणाला होता?

लग्न होईना, चौघींनी बहिणीच्याच १६ दिवसांच्या लेकराला संपवलं; पाय मोडले, गळा दाबून पायाखाली चिरडलं, धक्कादायक व्हिडीओ समोर

Latest Marathi Breaking News : पुणे महानगरपालिकेत बायोमॅट्रीक हजेरी सक्तीची, नोंदणी करण्याचे आदेश

Navale Bridge Accident: अपघातातील कंटेनर तपासणीत अडचणी; ब्रेक फेल की चालकाचे नियंत्रण सुटले? अहवालानंतरच स्पष्ट होणार

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT