Ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Latest Update : '…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील', भाजपाच्या माजी खासदाराचं वक्तव्य

Maharashtra Politics Update : अजित पवारांना मुख्यमंत्री पद देण्याबाबतच्या प्रश्नावर भाजपाच्या माजी खासदारांची प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maharashtra Politcs News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर अनेक आमदारांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहीर केला. तर राज्यातील इतर नेत्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजप-शिवसेना यांच्यासोबत महायुतीत प्रवेश केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. (Latest Marathi News)

भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलताना केला आहे. चव्हाण यांच्या दाव्यानंतर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे अजित पवार भाजपाबरोबर गेले, या पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याबद्दल करण्यात आलेल्या प्रश्नावर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे म्हणाले कि, “अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा कोणापासूनही लपलेली नाही. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, हे जगजाहीरच आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील, तर ते मुख्यमंत्री होतील, असं काकडे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर 'आगामी लोकसभा निवडणुकीत काय होतं? हे आपल्याला पाहावं लागेल. अजित पवार गट युतीत सामील झाला असला तरी देखील आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतात आणि कोण किती जागा निवडून आणतं, यावर सगळी आकडेमोड अवलंबून आहे', असंही काकडे पुढे बोलताना म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना संजय काकडे म्हणाले की, 'आम्ही बिहारमध्ये नितीश कुमारांची कमी नेते निवडून आले असतानाही त्यांना मुख्यमंत्री केलं होतं. त्याचं कारण म्हणजे त्यांनी आम्हाला लोकसभेला चांगलं सहकार्य केलं होतं. एकनाथ शिंदेंकडेही कमी आमदार असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं आहे. तर याआधीही मायावतींचे आमदार कमी असूनही भाजपाने मायावतींना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे अजित पवार आणि आमच्या नेतृत्वामध्ये काही ठरलं असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील', असंही ते पुढे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

'तर, ज्याचे आमदार जास्त निवडून येतील, तोच मुख्यमंत्री व्हायला हवा. पण काही वेळा असे प्रसंग येतात की, पक्षश्रेष्ठींना वेगळे निर्णय घ्यावे लागतात. पक्षश्रेष्ठींनी तसा शब्द अजित पवारांना दिला असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील', असंही ते म्हणालेत.(Latest Marathi News)

'अजित पवारांचं संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नेटवर्क आहे. याचा भाजपाला नक्कीच फायदा होईल. वरिष्ठांनी शब्द दिला असेल अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत मला काहीही गैर वाटत नाही', असंही काकडे पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT