Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "…तरच अजित पवार भाजपाबरोबर जाऊ शकतील", विधानसभा उपाध्यक्षांचं वक्तव्य

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसात अजित पवार राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अजित पवारांचा बंड मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या सर्व घडामोडीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. अजित पवारांची कथित बंडखोरी आणि शरद पवारांचा राजीनामा या दोन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्ही भाजपाबरोबर गेलो तरच अजित पवार भाजपाबरोबर जातील, असं वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार भाजपमद्धे जाणार आणि शरद पवारांचा राजीनामा या या दोन्ही गोष्टींवर बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले, अजित पवार भाजपबरोबर जाणार, हे प्रकरण शरद पवारांच्या राजीनाम्याच्या आधी एक-दीड महिन्यांपासून सुरू झालं होतं. याचा प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने वेगळा अर्थ लावला. त्यानंतर अजित पवार पक्षातून बाहेर जायला नको, म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिला, असं काही लोक म्हणतात. पण त्याच्यात कुठेही तथ्य नसल्याचं झिरवळ म्हणालेत.

तर पुढे झिरवळ म्हणाले की, 'मुळात अजित पवार हे भाजपात जाणार नव्हते. आम्ही गेलो तरच अजित पवार भाजपाबरोबर जातील. आम्हालाच जर माहीत नसेल की अजित पवार जाणार की नाही? तर तुम्ही-आम्ही अजित पवारांवर शंका का घ्यावी? लोक अशा पद्धतीने तर्क-वितर्क लावत असतात. पण दोन्ही घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: गरोदर महिलेचा खून करून फेकले रस्त्याचा कडेला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर..

SCROLL FOR NEXT