Eknath Khadse Latest News esakal
महाराष्ट्र बातम्या

EKnath Khadse: खोट्या गुन्ह्यात मला अटक करण्याचं षडयंत्र सुरू; खडसे यांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या अटक कऱण्यासाठी मोठं षडयंत्र रचण्यात येत असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Eknath Shinde news in Marathi)

एकनाथ खडसे म्हणाले की, मला एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने सांगितलं की, पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला काही नावंही सांगितले. जामनेरच्या पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.

खडसे पुढं म्हणाले की, जळगावमध्ये एकनाथ खडसे अडसर ठरत आहे. त्यामुळे सुडाचे राजकारण सुरू आहे. जळगावमघ्ये नाथाभाऊ उभा असला की, यांना एकही निवडणूक जिंकता येऊ शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आपल्यासोबत असं यापूर्वीही झालं आहे. त्यामुळे या धमक्यांना आणि षडयंत्रांना आपण घाबरणार नसल्याचं खडसे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT