cm eknath shinde and dcm devendra fadanvis esakal
महाराष्ट्र बातम्या

Sudhir Mungantiwar: नावावरून सरकारमध्ये वाद नाही, फडणवीसांच्या आग्रहाखातर दिलं अटलजींचं नाव

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत जवळपास 25 निर्णय घेण्यात आले. यामध्ये वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे. या संपूर्ण निर्णयावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

सुधीर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की, 'आज बैठकीत ४० पेक्षा जास्त निर्णयाला मंजूरी देण्यात आली. निराधार योजनेस मान्यता दिली. श्रावणबाळ योजनेमुळे ४० लाख मुलाना फायदा होईल. या मुलाच्या खात्यात थेट मदत जमा होणार आहे. तर १३५० हॉस्पिटल वाढवण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. (Latest Marathi News)

तर या बैठकीमध्ये १० मेडिकल कॉलेजला मान्यता दिली आहे. तर मच्छिमर बांधव जे पाकिस्तान सिमेवर मच्छिमारीसाठी जातात त्यांना अटक होते. अशा मच्छिमारांना सोडवण्याचा व त्याच्या कुटुंबाला ९ हजार महिना देण्याचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे.(Latest Marathi News)

तर पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एचटीएमएलला अटल बिहारी याचं नाव देण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे वर्सोवा उड्डाण पुलाला सावरकराचं तर एचटीएमएलला अटलजीचं नाव दिलं आहे. तर नावावरून काही वाद नाही. काही शकुणी असे वाद करतात. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे जोडीने काम करतात. ही शोलेची जय विरूची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.(Latest Marathi News)

तर २५ वर्षात काही बदल करण्यात वेळ लागेल.काही चूक झाली असं म्हणता येणार नाही. उड्डाण पुलाच्या नावावरून आता तेढ नको आहे. जे निर्णय घेण्यात आले आहेत ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी १५ आॉगस्टपर्यंत आढावा घेतला जाईल. वर्सोवा उड्डाण पुलाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच नाव दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT