Minister Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

जादूटोण्यावरुन मारहाणीच्या घटनेत हिंदू-दलित वाद नाही - विजय वडेट्टीवार

कोणत्याही माणसाला मारताना आपण कोणत्या युगात आहोत याचा विचार करावा.

वैदेही काणेकर

मुंबई: महाराष्ट्र तेलंगण सीमेवर (maharashtra telgan border) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भानामती केल्याच्या संशयातून (black magic) सात जणांना संपूर्ण गावकऱ्यांनी (villagers) भरचौकात बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrpur district) जिवती तालुक्यातील वणी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयावरुन खांबाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली.

या संपूर्ण प्रकारावर राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. "अत्यंत अमानुष आणि माणुसकीला काळिमा आणि समाजाचा मन हेलावणारी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलीस अधीक्षक तातडीने रवाना झाले असून हा हिंदू आणि दलित वाद नाही. 13 जणांना अटक केली आहे" अशी माहिती त्यांनी दिली.

"कोणत्याही माणसाला मारताना आपण कोणत्या युगात आहोत याचा विचार करावा. जादूटोणाच्या काल्पनिक गोष्टी पाहून मारहाण करणं निंदनीय आहे. महिला आणि वृद्धांना मारहाण करणाऱ्या लोकांना कडक शासन करावं" असे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. "जादूटोना, भानामती वैगेर बाबत अधिवेशनात आवाज उठवला होता. लोकांना धाक निर्माण झाला पाहिजे. पुढच्या अधिवेशनात यावर चर्चा झाली पाहिजे. ही हिंमत झाली, भविष्यात होऊ नये या विरोधात कायदे केले पाहिजेत" असे वडेट्टीवार म्हणाले. "अशिक्षितपणा अजून आहे, यामध्ये बघ्याची भूमिका अनेकांची होती ही खेदाची बाब आहे. मार खाणारे आणि मारणारे वयस्कर होते तरुणांनी पुढे येऊन हे सोडवलं पाहिजे. झालेला प्रकार निंदनीय आहे" असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार ओबीसीवर म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहीतच आहे. इम्पिरियल डेटा उपलब्ध झाला असता तर प्रश्न सुटला असता. प्रामाणिक आणि इमाने इतबारे आरक्षण टिकावं, हे वाटेल त्यांनी पुढे येऊन डेटा देण्यास मदत करावी. सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. पुढे सरकार ठरवेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT