Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज नाही; उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

सकाळ डिजिटल टीम

उदयनराजेंनी मीडियाशी बोलत असताना राजकारण्यांना नाव न घेता शिव्याही दिल्या आहेत.

सातारा : राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणानं सध्या जोर धरलाय. यावरून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. मला टॉम अॅण्ड जेरी कार्टून (Tom and Jerry Cartoon) आवडतं. मात्र, सध्या त्यापेक्षा राज्यात सुरू असलेल्या माकड उड्या सध्या मी पाहत असतो, अशी बोचरी टीका खासदार उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) केलीय. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज नसल्याचंही म्हटलंय.

दरम्यान, उदयनराजेंनी मीडियाशी बोलत असताना राजकारण्यांना नाव न घेता शिव्याही दिल्या आहेत. माझा आवडता कार्यक्रम टॉम अॅण्ड जेरी आहे, आता तो ही पाहायचा मी बंद केलाय. कारण, रोजच्या माकड उड्या पाहायला मिळत आहेत. असं सांगतानाच माझ्या हातात ईडी द्या. सगळ्यांना सरळ करतो, असा दमच उदयनराजेंनी दिला आहे.

यावेळी उदयनराजेंनी ईडीवरही (ED) टीका केलीय. ईडी म्हणजे चेष्टा झालीय. पान टपरीवरील बीडी सारखी ईडीची अवस्था झाली, असे जोरदार फटकारे उदयनराजेंनी मारले आहेत. उदयनराजेंना राज्याच्या परिस्थितीवर मत विचारण्यात आले असता, त्यांनी राजकारण्यांवर आसूड ओढायला सुरुवात केली. सध्या राज्यातलं वातावरण बिघडलं आहे, बिघडवलं कोणी याचा विचार केला पाहिजे. कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला आत टाकतंय. सगळं काही बेसलेस आहे. कोण म्हणतंय मी मुख्यमंत्री आहे, कोणी म्हणतंय मी आहे, असं सध्या राज्यात चाललंय. पण, महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवटीची कोणतीही गरज नसल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान, राज्यात भाजपकडून सतत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT