Nana Patole on Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

केंद्राच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होवू शकतो; नाना पटोलेंचा दावा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. या आधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून अनेक दावे प्रतिदावे कऱण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे.

काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन कऱण्यात आआहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडारा शहरात ही यात्रा काढण्यात आली होती. यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं की, देशात एक देश एक निवडणुकीचे काँग्रेस समर्थनच करणार आहे. मात्र ईव्हीएम मशीन बाबतचा संभ्रम दुर केला पाहीजेत. जगाच्या पाठिवर आज सर्वच देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात.

दरम्यान मुंबईला केंद्रशासित करण्याचा आणि महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप करताना नाना पटोले म्हणाले की, केंद्राच्या पाच दिवसाच्या अधिवेशात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. केंद्राचे हे विशेष अधिवेशन देशाची काय राखरांगोळी करून जाईल, हे आताच सांगता येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते म्हणाले की, आरक्षण देण्याचे अधिकार राज्याचे नाही. आता केंद्राचे विशेष अधिवेशन आहे. राज्यातील भाजपचे नेते व मुख्यमंत्री यांनी केंद्राला ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठविण्याची मागणी करावी, असंही पटोले यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT