There is no provision for Sant Peeth in maharashtra budget
There is no provision for Sant Peeth in maharashtra budget 
महाराष्ट्र

अर्थसंकल्पात संतपीठासाठी तरतूद नाही, वारकऱ्यांत संताप

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाचा गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकमेव प्रकल्प म्हणजे पैठण येथील संतपीठ. सर्वधर्मसमभाव तत्त्व शिकविणारे हे संतपीठ तात्काळ सुरू व्हावे म्हणून अनेक आंदोलने झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी या प्रश्नात लक्ष्य घातल्यानंतर शिक्षण विभागाने संतपीठ अभ्यासक्रम समिती नेमली. या समितीने आपला अंतिम अहवाल शिक्षण विभागास सादर केल्यानंतर जून 2019 पासून संतपीठ अभ्यासक्रम सुरू होणे अपेक्षित होते. तशी वाट महाराष्ट्रातील वारकरी संघटना व साहित्यिक पाहून होते. यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये अनेक नवीन योजना निधीसह जाहीर करण्यात आल्या. पण प्रलंबित असलेल्या 13 फेब्रुवारी 2014 ला शासनाने उद्घाटन केल्यानंतरही यंदाच्या आर्थिक बजेटमध्ये संतपीठासाठी निधीची तरतूद करण्यात न आल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक वारकरी संघटनांना धक्का बसला आहे. संत महंत, महाराज यांनी संताप व्यक्त करुन तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर संतपीठावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह जनतेत असंतोष पसरला आहे. 

अतिरीक्त अर्थ संकल्पात संतपीठासाठी भरीव निधीची तरतूद करण्याचे राहून गेल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंञी विनोद तावडे यांनी त्यांच्या उपलब्ध निधी खात्यातून, आकस्मिक निधीतून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनुदान तथा निधीतून संतपीठ चालविण्यासाठी आर्थिक तरतूद करावी. अशी मागणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार केशव म. चावरे, बाजीराव म. जवळेकर, ज्ञानेश्वर म. आपेगावकर, रख्माजी म. नवले, योगीराज म. गोसावी, प्रवचनकार दिनेश म. पारीख, बंडेराव जोशी, बबन म. चवरे, वारकरी संघटनांचे कार्यकर्ते सदानंद म. मगर, विलास मोरे, विष्णू ढवळे, सुभाष गवळी, रमेश पाठक, रमेश खांडेकर, डॉ. राम लोंढे, डॉ. प्रमोद कुमावत, डॉ. धनंजय अर्जुन, डॉ. संदीप शिरवत, डॉ. शेखर गोबरे, ॲड. चंद्रशेखर कुलकर्णी, ॲड. संदीप शिंदे, ॲड, राजेंद्र गोर्डे, ॲड. राहूल बाबर, प्रा. संतोष गव्हाणे, प्रा. गणेश मोहीते, प्रा. संतोष तांबे, प्रा. गणेश शिंदे, व्यापारी संघटनेचे कल्याण बरकसे, राम आहुजा, पवन लोहीया, राजकुमार रोहरा प्रवासी संघटनेचे केदार मिरदे, धनराज चितलांगी, विष्णू सोनार आदींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT