file photo 
महाराष्ट्र बातम्या

केवळ बदनामीसाठी केलेला खटाटोप आहे; मी उद्या सविस्तर बोलेल- बलात्काराच्या आरोपानंतर राजेश विटेकरांची प्रतिक्रिया

गणेश पांडे

परभणी ः पत्रकार परिषदेतून माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे केवळ बदनाचीसाठी केलेला खटाटोप आहे. परंतू मी यावर उद्या सविस्तर बोलेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी बुधवारी (ता.एक) दिली.

परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर परभणीतील एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व सदरील महिलेने एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुणे येथे हे आरोप केले आहेत. या संदर्भात विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून माझ्यावर लैगिंक अत्याचार केला. मला धमकावले, तुला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही असी धमकी देण्यात आली.

मी सोनपेठ पोलिस ठाण्यात गेल्यानंतर माझा गुन्हा नोंदविला गेला नाही. उलट माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप सदर महिलेने केले आहेत. या संदर्भात भू माता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राजेश विटेकरांना पक्षातून काढावे अशी मागणी देखील केली आहे. या संदर्भात राजेश विटेकरांशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपांचे खंडण केले.

हे केवळ माझी बदनामी करण्यासाठी केलेला खटाटोप आहे असे सांगत आपण यावर उद्या (शुक्रवारी, ता. दोन एप्रिल) रोजी पत्रकारांशी बोलणार आहोत. त्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईल असे सांगितले.

दरम्यान, राजेश विटेकरावर झालेल्या गंभीर आरोपामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर आता राजेश विटेकरांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजेश विटेकरांचा राजकीय प्रवास

विटा (ता.सोनपेठ) या गावाचे सरपंच पदापासून त्यांच्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. त्यानंतर सोनपेठ बाजार समितीच्या प्रशासक पदावर त्यांची निवड झाली. त्याच कालावधीत ते वडगाव (ता. सोनपेठ) जिल्हा परिषद गटातून सदस्य म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते अडीच वर्षासाठी परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहीले. त्यांचे वडील उत्तमराव विटेकर हे माजी आमदार होते. आई निर्मलाबाई विटेकर या सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये राजेश विटेकरांनी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना त्यांनी चांगलीच टक्कर दिली होती. परंतू यावेळी विटेकरांना नशिबाने साथ दिली नाही. परंतू पक्षात त्यांचे वजन चांगलेच वाढलेले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT