solapur mahapalika sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर महापालिकेत भाजपचे 9 व ‘एमआयएम’चा 1 नगरसेवक वाढणार! तडवळकर, पद्माकर काळे, जामगुंडी, पाटील यांना संधी; फिरदोस पटेल यांनाही आशा, वाचा...

महापालिका निवडणुकीत भाजपला ८७ जागांवर विजय मिळाला. आता १० सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. त्यानुसार भाजपला नऊ आणि आठ नगरसेवक निवडून आलेल्या ‘एमआयएम’ला एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. महापालिका आयुक्तांनी नगरसचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात तसे नमूद आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीत भाजपला ८७ जागांवर विजय मिळाला. आता १० सदस्यांमागे एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. त्यानुसार भाजपला नऊ आणि आठ नगरसेवक निवडून आलेल्या ‘एमआयएम’ला एक स्वीकृत नगरसेवक घेता येणार आहे. महापालिका आयुक्तांनी नगरसचिवांकडून मागितलेल्या मार्गदर्शनात तसे नमूद आहे.

स्वबळावर महापालिका लढलेल्या भाजपला मुस्लिमबहूल प्रभाग १४ आणि २० मध्ये यश मिळाले नाही. त्याठिकाणी ‘एमआयएम’चे उमेदवार विजयी झाले. २६ पैकी २१ प्रभागात भाजप उमेदवारांना पॅनल टू पॅनल मते मिळाल्याने तेथील सगळेच उमेदवार विजयी झाले. आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वत:च्या जागेवर माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. त्यांना किंवा श्रीकांत घाडगे यांना ‘स्वीकृत’ची संधी मिळू शकते. तसेच भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी निवडणुकीत मोठी मेहनत घेतली. ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडी, जगदीश पाटील यांचेही योगदान आहे. याशिवाय अन्य काही उमेदवार, नवीन चेहऱ्यांनीही पक्षाला मोठी मदत केली. त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबात ‘स्वीकृत’ची लॉटरी लागू शकते.

दुसरीकडे फिरदोस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलून पराभवाची चिंता न करता ‘एमआयएम’मध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. त्यांनाही ‘एमआयएम’कडून स्वीकृतची संधी मिळू शकते. गाझी जहागीरदार देखील स्वीकृतीचे प्रबळ दावेदार मानले जातात. ‘स्विकृत’साठी इच्छुकांचे स्थानिक आमदारांच्या घरी, संपर्क कार्यालयात हेलपाटे वाढले आहेत.

चार प्रभागात क्रॉस वोटिंग अन्‌...

  • १) प्रभाग सातमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनोरमा सपाटे, अनिकेत पिसे उमेदवार होते. भाजपच्या चार उमेदवारांपैकी श्रद्धा किरण पवार यांच्याविरुद्धच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार होता. प्रभागात भाजपला श्रद्धा पवार यांच्या रूपाने एकमेव विजय मिळाला. क्रॉस वोटिंगमुळे बाकीचे तिन्ही उमेदवार शिवसेनेचे निवडून आले. सपाटेंविरुद्ध लढलेल्या उत्तरा बचुटे-बरडे यांचा अवघ्या ८८ मतांनी पराभव झाला. येथे ‘नोटा’ला ३४५ मते आहेत.

  • २) प्रभाग १५ मध्ये भाजपच्या श्रीदेवी फुलारे यांना ९८७५, विजया खरात ९५७३, विनोद भोसले यांना १००५८ मते मिळाली. तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. पण, चौथे उमेदवार अंबादास करगुळे यांना भाजपच्या अन्य सहकाऱ्यांएवढी देखील मते नाहीत. काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी ८४९५ मते घेत करगुळेंचा २५१ मतांनी पराभव केला. येथे ‘नोटा’ला ३०८ मते आहेत. क्रॉस वोटिंगमुळे भाजपचा चौथा उमेदवार पडला.

  • ३) प्रभाग १६ मध्ये सर्वाधिक क्रॉस वोटिंग झाले. एक काँग्रेसचा व एक शिवसेनेचा आणि दोन भाजपचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या नरसिंह आसादे यांनी भाजपच्या रतिकांत कमलापुरेंचा ६८० मतांनी पराभव केला. येथे ‘नोटा’ला ९४३ मते आहेत. मुस्लिमबहूल प्रभागात भाजपच्या दिलीप कोल्हेंचा पराभव शिवसेनेचे प्रियदर्शन साठे यांनी केला. ‘एमआयएम’च्या फिरदोस पटेल यांचा भाजपच्या कल्पना कदम यांनी २२७ मतांनी पराभव केला. येथे ‘नोटा’ला ३४१ मते आहेत.

  • ४) प्रभाग २५ मध्ये भाजपच्या वैशाली भोपळे यांना ४९५४, सुमन चाबुकस्वार यांना ६०१८ मते मिळाली. दोघांचाही विजय झाला. पण, भाजपकडून उभारलेल्या नागेश ताकमोगे यांना आपल्याच पक्षातील विजयी उमेदवारांपेक्षाही कमी मते मिळाली. त्यांच्याविरोधातील वैभव हत्तुरे यांनी ५१२८ मते घेऊन विजय मिळविला. ताकमोगे यांना ४८३९ मते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: विदर्भाने इतिहास घडवला! थरारक फायनल जिंकून पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

तुम्ही सत्तेत तर याल पण...; भाजपवर जहरी टीका करत कपिल सिब्बल यांचा अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना मोठा संदेश, काय म्हणाले?

IND vs NZ, ODI: न्यूझीलंडविरुद्ध मालिका तर गमावली, आता विराट कोहली-रोहित शर्मा भारतीय संघाकडून पुन्हा कधी खेळणार?

Black Color Psychology : ज्यांना काळा रंग आवडत नाही त्या लोकांची पर्सनॅलिटी कशी असते? स्वभाव तर असा असतो की आयुष्यभर...

SCROLL FOR NEXT