Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: कर्नाटक निकालाचा राज्यात धसका? भाजपमध्ये होणार मोठे फेरबदल

रुपेश नामदास

कर्नाटक विधानसभेच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसून येत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्वबळावर सत्ता स्थापन केल्यामुळे राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्षाने धास्ती घेतली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत बैठकांची झोड उडली आहे. भाजपने राज्यात पक्ष आणखी मजबूत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठ्या फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. भाजपकडून संघटनात्मक पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्त्या केल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे.

आगामी निवडणुकांचा विचार करुन भाजप वेगळ्या प्रकारची रचना करण्याचा विचार करत आहे. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकी आगोदर या जबाबदारी तरूण चेहऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.

राज्यातील भाजपचे ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहे. तरुण पदाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर संधी भाजपकडून दिली जाणार आहे. जुन्या जिल्हाध्यक्षांच्या अनुभवानुसार त्यांची लोकसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली जाणार आहे.

जुन्या जिल्हाध्यक्षांना लोकसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी दिली जाणार आहे. तालुकाध्यक्ष आणि इतर महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका होणार आहेत. भाजपकडून जिल्हानिहाय संघटनात्मक दृष्टीने पक्षांतर्गत पालकमंत्र्यांची घोषणा केल्या जाणार आहेत. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २८८ मतदारसंघात नव्या नियुक्त्या दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT