motherhood

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापुरातील ‘या’ दवाखान्यांनी लपविली ३४ बालमातांची माहिती! परजिल्ह्यातील, ग्रामीणमधील अल्पवयीन मुलींची प्रसुती लपविली; आता पोलिसांत थेट गुन्हे

महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रांमध्ये, सिव्हिल हॉस्पिटल, श्री मार्कंडेय रुग्णालय, महिला शासकीय रुग्णालय, स्पॅन रुग्णालयासह अन्य काही रुग्णालयांमध्ये ३४ अल्पवयीन मुली बाळंत झाल्याची बाब दोन वर्षानंतर समोर आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या काही आरोग्य केंद्रांमध्ये, सिव्हिल हॉस्पिटल, श्री मार्कंडेय रुग्णालय, महिला शासकीय रुग्णालय, स्पॅन रुग्णालयासह अन्य काही रुग्णालयांमध्ये ३४ अल्पवयीन मुली बाळंत झाल्याची बाब दोन वर्षानंतर समोर आली आहे. मोहोळमधील सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस आता अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलासंह पती, सासू-सासरे, तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करीत आहेत. सध्या शहरातील जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

सोलापूर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे ९ एप्रिल २०२६ रोजी मोहोळच्या एका सामाजिक संस्थेचे पत्र प्राप्त झाले होते. त्याची गंभीर दखल पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी घेतली. पोलिसांनी माहितीची पडताळणी करुन थेट संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिकेने मात्र यात कारवाईसंदर्भात पोलिसांना कोणताही पत्र्यवहार केलेला नाही.

दरम्यान, आता गुन्हे दाखल झालेल्या प्रत्येकाची सखोल चौकशी केली जात आहे. बालमातेचा संसार जरी सुखाचा सुरु असला तरी त्यांनी कायदा मोडला आहे. त्यामुळे यात अल्पवयीन विवाहितेच्या पतीविरुद्ध ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी गुन्हे दाखल होणार आहेत. यात राज्य बालहक्क आयोगाने लक्ष घातले आहे. आता संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे.

परजिल्ह्यातील, दुसऱ्या राज्यातील अन्‌ सोलापूरच्या ग्रामीणमधील अल्पवयीन मुली

कोल्हापूर जिल्ह्यातील एक विवाहिता, जिचे सासर-माहेर त्याच जिल्ह्यातील आहे. तरीपण, २०२४ सालात ती प्रसुतीसाठी सोलापूर महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात आली होती. प्रसुतीवेळी त्या विवाहितेचे वय साडेसतरा वर्षे होते. दुसऱ्या जिल्ह्यातील ती अल्पवयीन विवाहिता सोलापूर शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी कशी आली, तिला कोणी येथील माहिती दिली होती, या बाबींचाही सखोल तपास सोलापूर शहर पोलिस करीत आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागातील व कर्नाटक राज्यातील देखील अल्पवयीन विवाहितांची सोलापूर शहरात प्रसुती झाल्या असून पोलिस त्या अल्पवयीन विवाहितेच्या नातेवाईकांकडेही चौकशी करणार आहेत.

दाखल झालेले गुन्हे असे...

  • १) विडी घरकूलमधील म्हेत्रे कुटुंबातील मुलगी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जाफळे गावातील मगदुम कुटुंबात दिली होती. प्रसुतीसाठी ती स्पॅन हॉस्पिटल व भावनाऋषी आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. प्रसुतीवेळी तिचे वय १७ वर्षे ९ महिने होते. यात मुलीचा पती, सासू-सासरा, मुलीची आई-वडील आणि दोन्ही रूग्णालयांच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • २) न्यु बुधवार पेठेतील मोरे कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विवाह गायकवाड कुटुंबात झाली होती. त्या अल्पवयीन मुलीला प्रसुतीसाठी महापालिकेच्या साबळे आरोग्य केंद्रात व महिला शासकीय रुग्णाालयात दाखल करण्यात आले होते. प्रसुतीवेळी तिचे वय १७ वर्षे ११ महिने होते. यात देखील दोन्ही रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अल्पवयीन मुलीचा पती, सासू-सासरा, दिर, आई-वडिलाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ३) जुना विडी घरकूलमधील भोसले कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच परिसरातील दोरकर कुटुंबात झाला. प्रसुतीसाठी ती अल्पवयीन विवाहिता बाराईमाम चौकातील डॉ. गुंजोटीकर रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसुतीवेळी तिचे वय १८ वर्षे चार महिने होते. यात देखील विवाहितेच्या सासर-माहेरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती न कळविल्याने तेथील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यावरही एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

  • ४) ज़ुना विडी घरकूलमधील रच्चा कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच परिसरातील जक्कन कुटुंबात झाला होता. प्रसुतीवेळी तिचे वय १८ वर्षे पाच महिने होते. प्रसुतीसाठी ती श्री मार्कंडेय रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. मात्र, रुग्णालयाने पोलिसांना त्याची माहिती कळविली नाही. यात अल्पवयीन विवाहितेच्या आई-वडिलांवर, सासू-सासरा व पतीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT