World Wildlife Day esakal
महाराष्ट्र बातम्या

World Wildlife Day 2024 : वन्यजीवांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात आहेत हे सहा राष्ट्रीय उद्याने...

सध्या वाढत्या आधुनिकीकरणाच्या काळात आपली निसर्गसंपत्ती संपुष्टात तर येणार नाही अशी भीतीही वाटते.

सकाळ डिजिटल टीम

National Parks in Maharashtra : जगात सर्वात सुंदर कोण असेल तर तो म्हणजे निसर्ग. निसर्गासारखं सुंदर काहीच नाही निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतित करण्या इतकं स्वर्गसुख कशातच नाही. सध्या वाढत्या आधुनिकीकरणाच्या काळात आपली निसर्गसंपत्ती संपुष्टात तर येणार नाही अशी भीतीही वाटते.

३ मार्च १९७३ रोजी 'कन्व्हेंशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेंजर्ड स्पीसीज ऑफ वाइल्ड फॉना अँड फ्लोरा' (CITES) ने जागतिक वन्यजीव दिन घोषित करण्याचा निर्णय घेतला, जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतींबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी या दिवसाची निर्मिती करण्यात आली.

अशात सरकारही जंगले, त्यातील वनस्पतींच्या विविध प्रजाती, प्राण्यांच्या प्रजाती टिकाव्या म्हणून विविध प्रकारच्या उपाययोजना करत असते. राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, तसेच विविध प्रकारची अभायारण्य हे त्याचाच भाग आहे.

बघूया महाराष्ट्रातले राष्ट्रीय अभयारण्ये

१. ताडोबा (Tadoba) :

National Parks in Maharashtra

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान असून त्याची घोषणा १९५५ साली झाली होती. ११५.१४ चौ. किमी क्षेत्रावर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानात पशू पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती पहावयास मिळतात.

२. पेंच (पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान) :

National Parks in Maharashtra

नागपूरमधील पेंच अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान हे अतिशय प्रसिद्ध असे राष्ट्रीय उद्यान असून ते २५७.९८ चौ.किमी क्षेत्रावर पसरलं आहे. १९७५ मध्ये हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.

३. नवेगाव बांध (Navegaon Bandh) :

National Parks in Maharashtra

गोंदिया जिल्ह्यात असलेलं नवेगाव बांध हे १३३.८८ चौ.किमी क्षेत्राचं राष्ट्रीय उद्यान आहे. याची घोषणा १९७५ मध्ये करण्यात आले.

४. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park)

National Parks in Maharashtra

मुंबई उपनगर (बोरीवली आणि ठाणे) या भागातील १०३.०९ चौ.किमी क्षेत्रावर वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा १९८३ मध्ये झाली. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी जिथं लोकांना श्वास घेणंही कठीण होऊन बसतं अशा ठिकाणी अशा प्रकारचे राष्ट्रीय उद्यान आहे, यावर भेट देणाऱ्यांचा विश्वास बसत नाही.

५. गुगामल (Gugamal)

National Parks in Maharashtra

मेळघाट, अमरावती येथील गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं उद्यान असून ते ३६१.२८ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेलं आहे. त्याची घोषणा १९८७ साली झाली.

६. चांदोली (Chandoli)

National Parks in Maharashtra

शिराळा (जि.सांगली) येथील चांदोली हे ३१७.६७ चौ.किमी क्षेत्रावर असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा २००४ मध्ये झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News: पालघर-संभाजीनगर बसला अपघात, 25हून अधिक प्रवासी जखमी

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT