They ride on the Cycle from Daund to Kanyakumari
They ride on the Cycle from Daund to Kanyakumari 
महाराष्ट्र

'त्यांनी' सायकलवरून केला दौंड ते कन्याकुमारी प्रवास

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे)  : लष्करातील जवान सौरभ झगडे आणि महावितरणमध्ये तंत्रज्ञ पदावर कार्यरत अनिस झगडे या दौंडमधील दोन युवकांनी दौंड ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास आठ दिवसांत पूर्ण केला आहे. 'हम फिट तो इंडिया फिट' आणि 'स्वच्छ भारत'चा संदेश घेऊन त्यांनी सायकल प्रवास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सुरू केलेल्या 'हम फिट तो इंडिया फिट' या मोहिमेला प्रतिसाद म्हणून सौरभ भारत झगडे आणि अनिल बापू झगडे यांनी सायकल प्रवास केला. सौरभ झगडे हे भारतीय लष्करातील 14 मराठा लाइट इन्फंट्रीमधील जवान आहेत तर अनिल झगडे हे शिर्सुफळ (ता. बारामती) येथे महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

रितसर रजा घेत दोघांनी 23 अॅाक्टोबर रोजी दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायकल प्रवास सुरू केला. दौंड मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुनीता कटारिया यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारऱ्यांनी दोघांना निरोप देत शुभेच्छा दिल्या होत्या. दररोज 200 किलोमीटर प्रवास करीत त्यांनी एकूण 1550 किलोमीटर अंतराची ही मोहिम पूर्ण केली, अशी माहिती सायकल क्लबचे डॅा. राजेश दाते यांनी दिली.

दरम्यान, सौरभ झगडे यांनी यापूर्वी एका दिवसात दौंड ते कोल्हापूर (243 किलोमीटर) असा सायकल प्रवास केला तर अनिल झगडे यांनी शिर्सुफळ ते पुणे असा सायकल प्रवास केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT