solapur city crime
sakal
सोलापूर : तेलंगणातून भाड्याची कार घेऊन चोरीसाठी सोलापुरात आलेल्या चोरट्याने प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातील १५ लाख ८० हजार रुपये चोरून नेले. शहरात कार लावून रिक्षाने चोरटा त्या ठिकाणी पोचला. मोठा बंगला, पण तेथे कोणीच नसल्याची संधी साधून त्याने चोरी केली होती. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले आहे. मोईन मौलानासाब देधुकुला (वय २९, रा. नरसापूर, विकाराबाद, तेलंगणा) असे त्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश वानकर यांच्या घरातील लोक शेजारील नातेवाइकांकडे गेले होते. त्यावेळी चोरटा वॉल कंपाउंडवरून घराच्या टेरेसवर चढला. तेथून तो सहजपणे आत उतरला. घरातील कपाटांची झडती घेत असताना त्याला एका कपाटात मोठी रोकड सापडली. रोकड असलेली पिशवी घेऊन चोरटा पायी पसार झाला. जाताना त्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेला होता. फिंगर प्रिंट पोलिसांना मिळू नयेत म्हणून त्याने हाताला रुमाल बांधला होता. मोठी रोकड चोरीला गेल्याने सलगर वस्ती पोलिसांबरोबरच शहर गुन्हे शाखेचे पथक चोरट्याचा शोध घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केल्यावर पोलिसांना एक संशयित दिसला. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पाच दिवसांतच जेरबंद केले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील सोनवणे यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके, राहुल तोगे, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, सतीश काटे, चालक बाळासाहेब काळे, सायबर पोलिस ठाण्याचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांच्या पथकाने पार पाडली.
गोव्यात जाऊन करणार होता मौज
प्रकाश वानकर यांच्या घरात चोरटा मोईन दुधेकुला याला १५ लाख ८० हजार रुपयांची रोकड सापडली होती. त्या पैशात तो गोव्याला जाऊन तेथे मौजमजा करणार होता. पण, पोलिसांनी गोव्याला जाण्यापूर्वीच त्याला तुरुंगात पाठविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.