गुगल मॅप

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

रस्त्यांचा मॅप पाहून येतात चोरटे! सोलापुरातील चोरी-घरफोडीतील ७५ टक्के चोरटे परजिल्ह्यातील; सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, संरक्षक भिंत नसलेली बंद घर टार्गेट, पण...

चोरटे स्वत:कडील दुचाकी, चारचाकीतून किंवा रेल्वे, एसटी बस, खासगी वाहनातून सोलापुरात येतात. सोलापुरात ते चोरी करण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मॅपचा वापर करतात. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेली घरे, ज्या घरी किंवा अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक व संरक्षक भिंत नाही, चोरीनंतर सहजपणे पळून जाता येईल, अशा बंद घरांमध्ये चोरी करुन ते लगेच पसार होतात, अशा बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी ५६० चोरी-घरफोड्या होतात. याशिवाय चेन स्नॅचिंगचेही प्रकार होतात. यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यातील चोरटे परजिल्ह्यातील, परराज्यातील असतात. चोरटे स्वत:कडील दुचाकी, चारचाकीतून किंवा रेल्वे, एसटी बस, खासगी वाहनातून सोलापुरात येतात. सोलापुरात ते चोरी करण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मॅपचा वापर करतात. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेली घरे, ज्या घरी किंवा अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक व संरक्षक भिंत नाही, चोरीनंतर सहजपणे पळून जाता येईल, अशा बंद घरांमध्ये चोरी करुन ते लगेच पसार होतात, अशा बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत.

सोलापुरात येणारे चोरटे रस्त्यांच्या माहितीसाठी गुगल मॅप वापरतात, असेही दिसून आले आहे. स्वत:जवळील एकही वस्तू चोरीच्या ठिकाणी चोरटे सोडत नाहीत, फिंगरप्रिंट पोलिसांना मिळणार नाहीत याचीही चोरटे दक्षता घेतात. लोकेशन मिळू नये म्हणून व्हॉट्‌सॲपवरून एकमेकांशी संपर्क साधतात. अशावेळी श्वान घटनास्थळावरच घुटमळते. अंगुलीमुद्रा विभाग, फॉरेन्सिक टीमला काही मिळत नाही. पण, खबरे व ‘सायबर’च्या मदतीने पोलिस चोरट्यांना शोधून आणतातच. याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या रेकॉर्डवरूनही (सीसीटीएनएस, आयसीजेएस) चोरटे शोधले जातात. गतवर्षी ३२५ गुन्ह्यातील फिर्यादींना दोन कोटी ९९ लाख ३७ हजार रुपयांचा चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी परत केला.

चोरीचे ठळक गुन्हे...

  • १) फेब्रुवारी २०२५ : जोडभावी पेठेतील दोन शिक्षिकांच्या घरातून चोरट्याने १४ लाख ३९ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अमन फैयाज शेख (रा. कसाईवाडा, कुर्ला वेस्ट मुंबई) याला पकडले.

  • २) एप्रिल २०२५ : सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या घरातून चोरट्याने १० तोळे सोन्याचे व १० तोळे चांदीचे दागिने चोरुन नेले होते. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) याला अटक केली. तो चोरीसाठी विमानाने प्रवास करीत होता.

  • ३) जून २०२५ : सोलापुरातील होटगी रोडवरील क्रोमा शोरूममधून चोरट्याने ३६ लाखांचे मोबाईल चोरले होते. यात रामा मंजु गुप्ता (वय ३७, रा. ठाणे) याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यातून जेरबंद केले.

  • ४) ऑक्टोबर २०२५ : सोलापुरातील अवंती नगरात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एक लाख १४ हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. शहर पोलिसांनी मेरबानसिंग मायासिंग दुधानी (रा. विजयपूर, कर्नाटक) व हरेश विजयकुमार रामत्री (रा. बदलापूर, ठाणे) यांना जेरबंद केले.

  • ५) मे २०२६ : जुळे सोलापुरातील एका बंद घरातून सव्वानऊ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर (वय ४८, रा. मळकाजगिरी, तेलंगणा) याला अटक केली.

  • ६) मे २०२६ : ४ मे रोजी मध्यरात्री न्यु बुधवार पेठेतील दोन घरांमध्ये चोरी झाली होती. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दीपक ढेरंगे (रा. शिरुर), दत्ता कदम (रा. नऱ्हे, ता. हवेली), साहेबराव बेंडुरे (रा. नवागाव, वेस्ट मुंबई) व आकाश आंग्रे (रा. बिबवेवाडी, पुणे) यांना अटक केली.

चोरटा कोठूनही आला, तरी त्याला पोलिस पकडतातच

महामार्गांमुळे काही तासांत चोरटे एका शहरातून दुसरीकडे ये-जा करतात. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांचे सदैव लक्ष असते. त्यामुळे चोरटे परजिल्ह्यात चोरी करतात. पण, आपणही त्या चोरट्यांना शोधून काढतोच. त्यासाठी अधिकारी-अंमलदारांची खूप मोठी मेहनत असते. नागरिकांनीही घरासमोर सीसीटीव्ही लावून त्याचे फुटेज साठवले तर त्याचा फायदा पोलिसांना होतो. अनोळखी संशयित आपल्या भागात फिरत असल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी. परगावी जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत.

- अरविंद माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे), सोलापूर शहर

सोलापूर शहरातील चोरीचे गुन्हे

  • सन दाखल गुन्हे उघड गुन्हे

  • २०२२ ५९८ २३९

  • २०२३ ५८६ ३२५

  • २०२४ ५७८ ३३८

  • २०२५ ५०१ ३५०

  • २०२६ १७९ १०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ‘बालसंगोपन’चा निधी लाडक्या बहिणींकडे वळविला; निराधार अन्‌ कोरोनात अनाथ झालेल्या चिमुकल्यांना वर्षापासून नाही लाभ, वाचा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २२ मे २०२६

Sports India: भारतामध्ये आता ‘डोपिंग’ ठरणार गुन्हा;केंद्रीय मंत्रालयाचे ऐतिहासिक पाऊल, पाच वर्षांचा तुरुंगवास अन्‌ दोन लाखांपर्यंत दंड

RCB vs SRH: बंगळूरला पराभूत करूनही हैदराबाद 'क्वालिफायर वन'मधून का बाद होऊ शकते? जाणून घ्या संपूर्ण समीकरण...

आजचे राशिभविष्य - २२ मे २०२६

SCROLL FOR NEXT