Solapur Theft

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

टोल नाके चुकवून चोरटे पुन्हा आडमार्गे पसार! सोलापूर शहर पोलिस म्हणतात, ‘अजून काहीच सुगावा नाही’; ‘तो’ चोरटा एसटी बसने गेला पळून, वाचा...

सोलापुरातील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास एटीएमच चोरून नेले. त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांच्या हद्दीतून चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील घरातून सुमारे २५ तोळे दागिने चोरले. दोन्ही गुन्ह्यांतील चोरटे महामार्गावरील टोल नाके चुकवून आडमार्गाने पसार झाले. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांत १०० पेक्षा जास्त सीसीटीव्हींचे फुटेज पडताळून देखील पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतून चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास एटीएमच चोरून नेले. त्यानंतर फौजदार चावडी पोलिसांच्या हद्दीतून चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील घरातून सुमारे २५ तोळे दागिने चोरले. दोन्ही गुन्ह्यांतील चोरटे महामार्गावरील टोल नाके चुकवून आडमार्गाने पसार झाले. त्यामुळे दोन्ही गुन्ह्यांत १०० पेक्षा जास्त सीसीटीव्हींचे फुटेज पडताळून देखील पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही.

मंगळवारी (ता. २३) भर दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी वसंत विहारमधील अमर रामचंद्र पवार यांच्या घरी चोरी केली. यात अंदाजे २५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले. चोरटे सावळेश्वरपर्यंत गेले, पण टोल नाक्याजवळून पुन्हा सोलापूरच्या दिशेने त्यांनी यू-टर्न घेतला. बोरामणीपर्यंत ते आल्याचे सीसीटीव्हीत दिसले, पण पुढच्या टोल नाक्यावरील सीसीटीव्हीत चोरट्यांची गाडी दिसत नाही. त्यामुळे बोरामणीतून चोरटे नेमके कोठे गेले, याचा तपास सुरू आहे.

तत्पूर्वी, विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील कल्याण नगर भाग- दोनमधील शिवबाळा भांजे यांच्या घरातून देखील ४९ तोळे दागिन्यांची चोरी झाली होती. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस, शहर गुन्हे शाखेची पथके त्या चोरट्यांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी अधिकारी- अंमलदार आवर्जून गस्त घालत आहेत. सायंकाळी महिला वॉकिंगसाठी, भाजीपाला आणायला, देवदर्शनासाठी जातात. या पार्श्वभूमीवर पोलिसांची नियमित गस्त सुरू केली आहे.

एसटी बसने गेला ‘तो’ चोरटा

शेळगी येथील बलदवा नगरातील ममता जगदीश पाटील यांच्या घरातून चोरट्याने २६ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास दोन लाख आठ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरटा चोरी करून एसटी बसने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pitbull Attack Video पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT