solapur city gold theft

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील वसंत विहारमध्ये अवघ्या २ तासांत चोरट्यांनी साधला डाव; २५ तोळे दागिने घेऊन चोरटे चारचाकीतून पसार, चुलत सासऱ्याने ठेवले होते जावयाकडे दागिने

सोलापुरातील वसंत विहार परिसरातील बदलवा हॉस्पिटलमागील अमर रामचंद्र पवार यांच्या घरात मंगळवारी (ता. २३) दुपारी सव्वातीन ते सव्वापाच या वेळेत चोरी झाली आहेत. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल २५ तोळे दागिने चोरून नेले आहे. या प्रकरणी अमर पवार यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील वसंत विहार परिसरातील बदलवा हॉस्पिटलमागील अमर रामचंद्र पवार यांच्या घरात मंगळवारी (ता. २३) दुपारी सव्वातीन ते सव्वापाच या वेळेत चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल २५ तोळे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अमर पवार यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

वसंत विहारमधील अमर पवार यांचा भाऊ ‘पेटीएम’मध्ये नोकरी करतो. त्यांचे वडील जुनी मिल कंपाउंड येथे कामाला आहेत. अमर यांची पत्नी व मुले पुण्याला गेले आहेत. दुपारी तीनच्या सुमारास अमर यांना कॉल आला आणि ते घर बंद करून शहरात आले. त्यावेळी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटे चोरट्यांनी उचकटली. त्यातील एका बेडरूममधील कपाटात दागिने होते.

चोरट्यांनी ते सगळे दागिने घेतले आणि अवघ्या काही मिनिटांत तेथून पोबारा केला. फिर्यादीचे साडेसोळा तोळे दागिने चोरीला गेले आहेत. त्यांच्या चुलत सासऱ्याचे नेमके किती तोळे दागिने होते हे समजू शकलेले नाही. ते परगावाहून आल्यावर फिर्यादीत दाखल दागिने वाढतील. पण, अंदाजे २५ तोळे दागिने चोरीला गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, सहायक पोलिस निरीक्षक श्री. जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथक, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सोनवणे हेही घटनास्थळी गेले होते. फिंगर प्रिंट पथकाने कुलूप व कपाटावरील काही फिंगर प्रिंट घेतले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत तपास करीत आहेत.

चुलत सासरे परगावी; जावयाकडे ठेवले होते दागिने

फिर्यादी अमर पवार यांचे चुलत सासरे परगावी गेले आहेत. शहरातील बंद घरांमध्ये चोरी होत असल्याने त्यांनी गावी जाण्यापूर्वी आपल्या घरातील दागिने चुलत जावई पवार यांच्या घरी आणून ठेवले होते. चोरीला गेलेल्यामध्ये त्यांचेही दागिने आहेत.

श्वान पथक जागेवरच घुटमळले; आता ‘सीसीटीव्हीं’ची पडताळणी

घरफोडी झाल्यानंतर श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते, पण ते जागेवरच घुटमळले. ज्यांच्या घरी चोरी झाली तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील फुटेज मिळवून त्याची पडताळणी सुरू केली आहे. ते काम दोन अधिकारी, चार कर्मचारी करीत आहेत. चोरटे चारचाकीतून आले आणि वसंत विहारकडून जुना पूना नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी, अमित शहा संसदेत, लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT