Vidhimandal 
महाराष्ट्र बातम्या

पस्तीस टक्के कैद्यांना त्वचेचे आजार

ज्ञानेश सावंत

मुंबई - पुण्यातील येरवडा कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जवळपास अडीच पट अधिक म्हणजे, पावणेसहा हजार कैद्यांना कोंबल्याने त्यातील ३५ टक्के कैदी त्वचेच्या आजाराच्या जाळ्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

कारागृहातील सुमारे ५ हजार ८०० कैद्यांपैकी २ हजार १९३ जणांना त्वचेचा आजार झाल्याची वस्तुस्थिती राज्याच्या गृहखात्याने सोमवारी मांडली आहे. या कारागृहाची क्षमता २ हजार ४४९ इतकी असून, त्यातील बराकीत प्रत्येकी १२० कैद्यांना राहण्याची सोय आहे. प्रत्यक्षात मात्र त्याठिकाणी ३८३ कैद्यांना ठेवले आहे. कैद्यांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी मान्य केले आहे. आमदार भीमराव तापकीर, राहुल कूल, सुनील प्रभू यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली.

कारागृहांची क्षमता वाढविण्याच्या योजनांना वेग दिला जाईल. कैद्यांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. आढावा घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करू.
- अनिल देशमुख, गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT