sakal
महाराष्ट्र बातम्या

चक्रीवादळांचे नाव कसं ठरवलं जातं?, जाणून घ्या

'गुलाब' नावाचे तिसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात भुवनेश्वर जवळ बनत आहे.

सकाळ डिजिटल टीम

'गुलाब' नावाचे तिसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात भुवनेश्वर जवळ बनत आहे. तयार होणाऱ्या या चक्रीवादळाला 'गुलाब' हे पाकिस्तान ने दिलेले नाव आहे. यापूर्वी आपण 'तौत्के' व 'यास' वादळांचा अनुभव घेतला आहे. चक्रीवादळांची निर्मिती कशी होते तसेच या वादळांचे नामकरण कसे व कोण करते याविषयी आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी माहिती दिली आहे.

वर्ष 2004 मध्ये जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ)च्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं. यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात.

चक्रिवादळांची अनुक्रमे गुलाब व शाहीन नावे देण्याचे ठरले आहे. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रिवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला हरिकेन आणि पॅसिफिक महासागरातील चक्रिवादळाला टायफून या नावाने ओळखले जाते. वातावरणातील विविध बदलांमुळे मान्सून पॅटर्नबरोबरच चक्रिवादळांचा पॅटर्नदेखील बदलला आहे.

एखाद्या ठिकाणी तापमान जास्त झाले व इतर भागांत ढगाळ वातावरणामुळे वा अन्य कारणांमुळे तापमान कमी झाले, तर हा तापमानातील फरक भरून काढण्यासाठी हवा जोरात वाहू लागते. तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली, तर वादळाचा जन्म होतो. खरे तर चक्रिवादळे तयार होण्याची प्रक्रिया ही अतिशय संथ गतीने म्हणजे 240 ते 250 तासांची असते.

12 वर्षांपूर्वी सार्क देशांच्या 20 आणि 21 ऑगस्ट 2008 च्या 'नॉर्व्हेस्टर अँड टॉर्नेडोज ओवर दि सार्क रिजन अँंड देअर फोरकास्टिंग अँड प्रीपेयर्डनेस' या बांगलादेशाची राजधानी ढाका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत 'रीअल टाइम ऑनलाइन टॉर्नेडोज डिटेक्शन, मॉनेटरिंग, नाऊ कास्टिंग, फोरकास्टिंग अँड प्रीपेयर्डनेस युजिंग स्मार्ट सेन्सर सिस्टम' या शोधनिबंधात चक्रिवादळांचा वेध 'रियर टाइम' कसा घ्यायचा आणि त्याबरोबर त्यांचा सामना करताना जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबातचा आराखडा व यंत्रणेची रूपरेषा मांडली होती.

एखाद्या व्यक्तीला चिडवत आपण जसे त्याला काही तरी वेगळेच नाव देतो, तसे ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञांनी एकमेकांना माहितीचे आदान-प्रदान करत संवाद साधताना सर्वप्रथम वादळांना गंमत म्हणून नावे द्यायला नव्हे, तर नावे ठेवायला सुरुवात केली. कधी आपल्या नावडत्या राजकीय नेत्यांच्या नावाने, तर कधी आपल्या बायकोच्या किंवा गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडच्या नावाने मग वादळे ओळखली जाऊ लागलीत.

1979 मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री-पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला. जागतिक हवामान संस्थेने 2000 पासून एक नियमावली बनवत, काही मापदंड (स्टँंडर्ड) तयार केले व निसर्गाशी संबंधित किंवा एखाद्या खाद्य पदार्थाची नावे चक्रिवादळांना मिळू लागली. आलटून पालटून स्त्रीलिंगी व पुल्लिंगी नावांचा वापरही सुरू झाला. 'निसर्ग' हे नाव चक्रिवादळाला बांगलादेशाने घोषित केले होते. पुढील काही चक्रिवादळांची नावे गती (भारतद्वारे नामित), निवार (इराण), बुरेवी (मालदीव), तौक्ते (म्यानमार) आणि यास (ओमान) अशी असतील.

जगातल्या चक्रिवादळांच्या नामकरणाची जबाबदारी ही रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटर्स आणि ट्रॉपिकल सायक्लोन वार्मिंग सेंटर्स यांची आहे. भारताच्या हवामान खात्यासह एकूण सहा आरएसएमसी आणि पाच टीसीडब्ल्यूसी आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर भारतीय समुद्रावर विकसित होणाऱ्या चक्रिवादळांची नावे ठेवण्याची जबाबदारी भारतीय हवामानशास्त्र विभागाला (आयएमडी) देण्यात आली आहे.

जागतिक हवामान संस्था म्हणजे वर्ल्ड मेटिओरॉलॉजी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) आणि आशिया आणि पॅसिफिकसाठीचे संयुक्त राष्ट्रांचे आर्थिक आणि सामाजिक आयोग म्हणजे यूएन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक यांनी 2000 मध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्ण कटिबंधीय चक्रिवादळांना नावे देण्यास सहमती दर्शविली होती. परिणामी हिंद महासागरात म्हणजे बंगालच्या उपसागरातील व अरबी समुद्रातील चक्रिवादळांना नावे देण्याचे काम 2000 मध्ये सुरू झाले आणि 2004 मध्ये फॉर्म्युल्यावर सहमती झाली.

बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे या पॅनलचा भाग होते. नंतर 2018 मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि येमेन यांना या यादीत समाविष्ट केले गेले. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, वादळांचे नामकरण करताना नावे लिंग, राजकारण, धर्म आणि संस्कृती याबाबत पक्षपाती नसावे तसेच कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही व काही आक्षेपार्ह नसावे.

तसेच ते छोटे व उच्चार करण्यास सोपे आणि सुलभ असावे असा नियम आहे. वादळांचा इशारा प्रभावीपणे लोकांना देण्यासाठी तसेच सायंटिफिक कम्युनिटीला आणि आपत्ती व्यवस्थापकांना मदत करण्यासाठी ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधीय चक्रिवादळांना नावे देण्यात येते. एकाच वेळी अनेक वादळे निर्माण झाल्यास त्यांना ओळखण्यासदेखील यामुळे मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT