vijay wadettiwar 
महाराष्ट्र बातम्या

Nanded Hospital Deaths : ....हा तर नालायक सरकारचा नाकर्तेपणा; नांदेड रुग्णालयातील घटनेवरून वडेट्टीवारांचा हल्लाबोल

रवींद्र देशमुख

मुंबई - नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील काही तासांत दोन डझनहून अधिक रुग्ण दगावले असून यामध्ये नवजात बालकांचा समावेश आहे. यावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच आज विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ४१ लोकांचा बळी गेला. त्यात नवजात बालकांची संख्या जास्त आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे हे सगळ घडत आहे. सरकारनेच या सगळ्यांचा बळी घेतला आहे. याला रूग्णालय न म्हणता स्मशानभूमी म्हणाव का असा प्रश्न पडल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

ठाण्यातील घटनेच्या चौकशीची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. डिलिव्हरीच्या काळात गरीबांच्या मुलांचा मृत्यू होत आहे. वर्ष भरात ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. येथे पूर्ण वेळ डीन नाही. अद्याप डॉक्टरची व्हिजीट नाही. साप चावल्यानंतरच्या उपचाराची औषधे नाहीत. लहान बालकांची औषधे नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

दरम्यान आपण आरोग्य मंत्र्यांच्या कामाचा पंचनामा करणार आहोत. हसन मुश्रीफ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा हवा. हा नालायक सरकारचा नाकर्तेपणा असून केवळ बदल्या आणि टेंडरमध्ये २० टक्के वसूली सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. यावेळी त्यांनी डीनला तात्काळ निलंबीत करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: परदेशातून येतोय भारताचा खजिना; 64 टन सोनं देशात, नेमकं काय घडलं?

World Cup 2025: W,W,W... सेमीफायनलमध्ये ड्रामा! इंग्लंडने शून्यावर गमावल्या तीन विकेट्स, द. आफ्रिकेची धारदार गोलंदाजी; पाहा Video

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरुन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT