Nawab malik-samir wankhede google
महाराष्ट्र बातम्या

NCBच्या अज्ञात अधिकाऱ्यांचं 'हे' पत्र; 26 खोट्या केसेसबाबत मलिकांचा मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नवाब मलिक यांनी आज एक पत्रकार परिषद घेत आणखी काही खुलासे केले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र आल्याचं म्हटलंय. या पत्रात 26 वेगवेगळ्या केसेसबाबतची माहिती आहेत. अशा केसेस ज्यामध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलंय अथवा फसवण्यात आलंय. नवाब मलिकांनी हे पत्र ट्विट केलं आहे.

मलिकांनी म्हटलंय की, मी खुलासे केल्यावर माझ्यावरच आरोप करण्यात आले. मात्र, मी हिंदू-मुस्मि करत हा मुद्दा पुढे नेत नाहीये. शाहरुख खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक असे मुसलमान या लढाईत उतरलेत, असा भाजप आरोप करतंय. मात्र मी आजवर कधीच धर्माचं राजकारण केलं नाहीये. कालचा मुद्दा धर्माचा नव्हता तर खोट्या जन्मदाखला सादर करुन नोकरी प्राप्त करण्याचा आहे.

पुढे ते म्हणाले की, काल जन्मदाखला शेअर केल्यावर मोठा गजहब झाला. मी दिलेल्या माहितीवर मी ठाम आहे. जो व्यक्ती खोटा दाखला दाखल करुन मागासवर्गीय जागेवरुन नोकरी प्राप्त करतो, त्याच्यावर माझा आरोप आहे. आमची लढाई एनसीबीबरोबर नाही. मी कधीही धर्माचं राजकारण केलेलं नाहीये. जो जन्मदाखला आम्ही ट्विट केलाय तो खरा आहे. दाऊद वानखेडे हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यावर खाडाखोड करुन छेडछाड करण्यात आली आहे. आम्ही दिड महिन्यापासून हे कागद शोधत होतो. त्यानंतर हा कागद सापडला आहे. ज्ञानेश्वर वानखेडे जन्मापासून दलित आहेत. त्यांनी त्या आधारे नोकरी केली. नंतर ते मुसलमान झाले. समीर वानखेडेंनी वडिलांच्या सर्टीफिकेटचा आधार घेत स्वत:चं सर्टीफिकेट बनवलं. गरिब मागासवर्गीयाची जागा अडवली असून गैरफायदा घेतला आहे. या प्रमाणपत्रावर व्हॅलिडीटी कमिटीकडून चौकशी होईल. कायद्यानुसार नक्कीच कारवाई होईल.

अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र

नवाब मलिकांनी म्हटलंय की, ट्विटरवर एक पत्र मी पोस्ट केलंय. एनसीबीतील एका अधिकाऱ्याने मला पाठवलंय. दोन दिवसाआधी मला ते मिळालंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना देखील ते मी दिलंय. यामध्ये 26 केसेसचा उल्लेख केला गेलाय. कशाप्रकारे पैसे वसूल केली जाते, कशाप्रकारे चुकीची कामे केली जाते, याचा उल्लेख त्या पत्रात आहे. एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून हे पत्र मला प्राप्त झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT