kalyan railway station  esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : कल्याण रेल्वे स्थानकात तीन प्रवाशांना मारहाण करुन लुटलं; घटना 'सीसीटीव्ही'त कैद

सकाळ डिजिटल टीम

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पूलावर तीन प्रवाशांना मारहाण करत लुटण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासत त्याआधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

कल्याण रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलावर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुखवीर सिंग या प्रवाशाला सकाळी पुणे येथे जावयाचे होते. याकरीता सोमवारी रात्री ते कल्याण रेल्वे स्थानकात आले होते. रेल्वेची वाट पाहत असतानाच त्यांना डोळा लागला.

सुखविंदर हे झोपले असल्याचे पाहून त्या ठिकाणी चार तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांना लाथ मारुन त्या तरुणांनी उठविले. धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली. अशाच पद्धतीने रेल्वे स्थानकातील दोन प्रवाशांना देखील मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल, रोकड यांसारख्या वस्तू चोरुन नेल्या.

याप्रकरणी सुखबीर सिंग यांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. इतर दोन प्रवाशी अद्यापपर्यंत तक्रार करण्यास आलेले नाही. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत या आरोपींचा शोध सुरू केला आणि हे चौघे आरोपी निष्पन्न झाले.

कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. दीपक मगर, कुणाल गोंधळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून चौथा आरोपी साहिल काकड याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT