Gulabrao Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil : पाच वर्षांत तीन शपथविधी, तीनही वेळा आपण उपस्थित; गुलाबराव पाटलांचं विधान

रवींद्र देशमुख

जळगाव - २०१९ च्या विधासनभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा राजकारणात धक्कादायक घडामोडी घडल्या. आधी अजित पवार-देवेंद्र फडणवीसांचं सरकार, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आणि आता शिंदे-फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. त्यात आता अजित पवारांची एंट्री झाली. यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक विधान केलं.

गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच वर्षांत सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तीनही टाईम शपथविधी झाले. या तीनही वेळा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिरपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.

ते पुढं म्हणाले की, पाच वर्षांत अशी कोणतीच पार्टी नाही की जिने सरकार चालवलं नाही. मात्र 35 वर्ष ज्यांच्याबरोबर काढली, त्यांना सोडून दुसऱ्यांसोबत जाऊन त्यांचा देखील विश्वास संपादन करणे हे आपल्यासारख्या माणसासाठी फार कठीण काम होत, असंही मंत्री पाटील यांनी म्हटलं.

विद्यार्थ्यांचं आणि आमचं सारखंच आहे असे म्हणत, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं आम्हाला देखील नापास झालं तर पाच वर्ष थांबावं लागतं. 17 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागते. त्यातही जमलं नाही तर, चाललं आपल्या घरी, अशी परिस्थिती असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT