महाराष्ट्र बातम्या

Coronavirus: राज्यात कोरोनाचा धोका कायम

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले १७ लाख ५७ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ टक्के आहे. मात्र, त्याच वेळी अद्यापही ७४ हजार रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका अजून पूर्ण संपला नसल्याचे दिसून येते.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळला होता. त्यानंतर सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वेगाने वाढली. सप्टेंबरमध्ये देशात सर्वाधिक रुग्ण राज्यात असल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ टक्के असल्याचे सांगण्यात आले. राज्यात आजपर्यंत १८ लाख ८० हजार ४१६ रुग्णांना कोरोना झाला. त्यापैकी १७ लाख ५७ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी तीन हजार ७१७ नवीन रुग्ण आढळून आले. तर तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. मृत्यू होण्याचा दर २.५६ टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजपर्यंतची स्थिती
कोरोना रुग्णांची एकूण संख्या : १८ लाख ८० हजार ४१६
तपासण्यात आलेले नमुने :     १ कोटी १७ लाख २ हजार ४५७
मृत्यू : ४८ हजार २०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : प्रमुख मंदिरांच्या अधिकारांमध्ये मोठा बदल; धर्मदाय आयुक्तालयाकडे संपूर्ण सूत्रे

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT